नवऱ्याचे मेहुणीसोबत प्रेमसंबंध… ‘रामायण’ फेम अभिनेत्रीच्या मृत्यूची माहिती 2 दिवसांपर्यंत कोणालाच नव्हती

नवऱ्याचं अफेअर ते ही स्वतःच्याच बहिणीसोबत..., अभिनेत्रीचा मृत्यू तर अत्यंत हृदयद्रावक... मृत्यूची माहिती 2 दिवसांपर्यंत कोणालाच नव्हती, त्यानंतर..., आजही अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते...

नवऱ्याचे मेहुणीसोबत प्रेमसंबंध... रामायण फेम अभिनेत्रीच्या मृत्यूची माहिती 2 दिवसांपर्यंत कोणालाच नव्हती
अभिनेत्री ललिता पवार
| Updated on: Nov 30, 2025 | 4:01 PM

झगमगत्या विश्वातील ग्लॅमरस बाजू प्रत्येकाला दिसते, पण पडद्यामागचं आयुष्य फार वेगळं असतं.. असं अनेकदा समोर देखील आलं आहे. अभिनेत्री प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचल्या असल्या तरी, खासगी आयुष्यात मात्र त्यांना अनेक चढ – उतारांचा सामना करावा लागतो… असंच एका अभिनेत्रीसोबत झालं आहे… पडद्यावर अभिनेत्रीने प्रेक्षकांना घाबरवलं, पण खऱ्या आयुष्यात स्वतः अभिनेत्री घबरत जगत होती… नवऱ्याची तर साथ कधी अभिनेत्री मिळाली नाही. पण तिच्या मृत्यूच्या दोन दिवसांनंतर देखील कोणाला तिच्याबद्दल काहीही कळलं नाही…

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘रामायण’ मालिकेत मंथरा ही भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री ललिता पवार आहे.. आज अभिनेत्री आपल्यात नसली तरी, तिच्याबद्दल अनेक गोष्टी आज देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असतात.

मेहुणीसोबत नवऱ्याचे प्रेमसंबंध…

ललिता पवार हिने 1930 मध्ये निर्माता गणपतराव पवार याच्यासोबत लग्न केलं. एका सिनेमा दरम्यान दोघांची ओळख ढाली आणि कुटुंबियांना सांगून त्यांनी लग्न केलं… पण लग्नाच्या काही वर्षांनी नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं अभिनेत्रीला कळलं…

पण अभिनेत्रीला धक्का तेव्हा लागला जेव्हा तिला कळलं की, नवऱ्याचे संबंध दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या महिलेसोबत नाही तर, स्वतःच्या बहिणीसोबत अफेअर सुरु होतं… हे सत्य कळताच ललिता हिने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला… त्यानंतर ललिला हिने दुसरं लग्न राजप्रकाश गुप्ता यांच्यासोबत केलं… राजप्रकाश गुप्ता आणि ललिता पवार यांचा एक मुलगा देखील आहे.

अभिनेत्रीचं हृदयद्रावक निधन…

1990 मध्ये, अभिनेत्रीला तोंडाच्या कॅन्सरचं निदान झालं आणि ती उपचारासाठी पुण्याला गेली. रिपोर्टनुसार, उपचारादरम्यान तिचे निधन झालं.ललिता पवार हिच्या मृत्यूच्या वेळी पती आणि मुलगा दोघेही शहराबाहेर होते, त्यामुळे त्यांना दोन दिवस अभिनेत्रीच्या मृत्यूची कोणतीही बातमी मिळाली नाही. जेव्हा तिच्या मुलाने घरी फोन केला तेव्हा कोणीही उत्तर दिलं नाही, ज्यामुळे तो चिंता वाटू लागली. त्याने त्याच्या जवळच्या व्यक्तीला चौकशी करण्यास सांगितलं आणि तेव्हाच त्याला कळलं की या दिग्गज अभिनेत्रीचे निधन झालं आहे.