धक्कादायक! धर्मेंद्र यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीला चालत्या ट्रेनमध्ये करावी लागली आंघोळ, कारण ऐकून थक्क व्हाल

बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्रीला चालत्या ट्रेनमध्ये करावी लागली होती अंघोळ. नेमकं काय होतं कारण? धमेंद्र यांच्यासोबत दिलेत 16 चित्रपट.

धक्कादायक! धर्मेंद्र यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीला चालत्या ट्रेनमध्ये करावी लागली आंघोळ, कारण ऐकून थक्क व्हाल
| Updated on: Jan 11, 2026 | 6:14 PM

Bollywood Actress : हिंदी चित्रपटसृष्टीचे ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आता या जगात नसले तरी त्यांच्या भूमिका, गाजलेल्या चित्रपटांमुळे आणि अनेक आठवणींमुळे ते कायमच चाहत्यांच्या मनात जिवंत राहणार आहेत. नुकताच त्यांचा ‘इक्कीस’ हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला असून यासोबतच तब्बल 65 वर्षांच्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीचा शेवट झाला आहे.

धर्मेंद्र यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं असून अनेक दिग्गज अभिनेत्रींसोबत त्यांनी रोमँटिक भूमिका साकारल्या आहेत. त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत त्यांनी सर्वाधिक चित्रपट केले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यात 13 वर्षांचा फरक होता. मात्र, एका अभिनेत्रींसोबत काम करताना हा वयाचा फरक तब्बल 27 वर्षांचा होता.

चालत्या ट्रेनमध्ये आंघोळ करण्याची वेळ

ही अभिनेत्री म्हणजे 80च्या दशकातील प्रसिद्ध स्टार जया प्रदा. धर्मेंद्र आणि जया प्रदा यांनी तब्बल 16 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. आज जया प्रदांशी संबंधित एक असा किस्सा समोर आला आहे जो ऐकून अनेकांना धक्का बसेल.

हा किस्सा जया प्रदा यांच्या पहिल्याच हिंदी चित्रपटाशी संबंधित आहे. या चित्रपटाचे नाव ‘सरगम’ आहे. 63 वर्षांच्या असलेल्या जया प्रदांनी अवघ्या 17 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘सरगम’ हा चित्रपट 1979 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन के. विश्वनाथ यांनी केलं होतं.

एका दिवशी शूटिंगचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त होतं. त्यामुळे वेळेत शूटिंगच्या ठिकाणी जाण्यासाठी जया प्रदा यांनी थेट चालत्या ट्रेनमध्येच आंघोळ करावी लागली. सोयीसुविधांचा अभाव आणि दिग्दर्शक नाराज होऊ नयेत यासाठी त्यांनी हा कठीण निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं.

‘डफलीवाले डफली बजा’ गाण्याची शूटिंग

त्या दिवशी जया प्रदा यांना ऋषी कपूरसोबत ‘डफलीवाले डफली बजा’ या गाण्याचं शूटिंग करायचं होतं. या गाण्याच्या शूटिंगसाठी त्या तयार होणं अत्यंत आवश्यक होतं. त्यामुळे कोणताही विलंब न होता शूटिंग पूर्ण व्हावं यासाठी त्यांनी चालत्या ट्रेनमध्ये आंघोळ करण्याचं धाडस केलं.

विशेष म्हणजे हे गाणं पुढे प्रचंड लोकप्रिय ठरलं. हिंदी चित्रपटाच्या दोन महान गायकांनी म्हणजेच लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी या गाण्याला आवाज दिला होता. आजही हे गाणं प्रेक्षकांच्या ओठांवर आहे.