खासदार झाल्यानंतर कंगना राणावत हिला मिळत आहेत ‘या’ सुविधा, लाखांच्या घरात मानधन, फ्रीमध्ये घर आणि विमान सेवा ते..

Kangana Ranaut Salary : कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. कंगना राणावतची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. कंगना राणावत आता चित्रपटांनंतर राजकारणात सक्रिय झाल्याचे बघायला मिळतंय. कंगना राणावतने लोकसभेची निवडणूक मंडी येथील जिंकली आहे.

खासदार झाल्यानंतर कंगना राणावत हिला मिळत आहेत या सुविधा, लाखांच्या घरात मानधन, फ्रीमध्ये घर आणि विमान सेवा ते..
Kangana Ranaut
| Updated on: Jun 20, 2024 | 5:00 PM

बॉलिवूड अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत चांगलीच चर्चेत आलीये. कंगना राणावत हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. कंगना राणावत सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. विषय कोणत्याही असो कंगना राणावत आपले मत मांडताना फार काही विचार करत नाही. कंगना राणावत हिच्यासोबत चंदीगड विमानतळावर एक अत्यंत हैराण करणारा प्रकार घडला. सुरक्षा कर्मचारी असलेल्या महिलेने चक्क कंगना राणावत हिच्या कानाखाली जाळ काढला. या प्रकाराचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले.

कंगना राणावत हिच्यासोबत घडलेल्या या घटनेनंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला. कंगना राणावत हिने लोकसभेची निवडणूक मंडी येथून जिंकली. आता खासदार झाल्यानंतर कंगना राणावत हिला अनेक सुविधा मिळत आहेत. कंगना हिला तिच्या लोकसभा मतदारसंघासाठी दर महिन्याला 70,000 रुपये मिळणार आहेत.

कार्यालयीन खर्चासाठी दर महिन्याला 60,000 रुपये मिळतील. हेच नाही तर आता खासदार झाल्यानंतर कंगना राणावत हिला एका महिन्याला तब्बल एक लाख रूपये मानधन देखील मिळणार. फक्त मानधनच नाही तर अनेक सुविधा देखील तिला मिळणार आहेत. हाय-स्पीड इंटरनेट, दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत मोफत कॉल सुविधा देखील मिळणार आहे.

अभिनेत्रीला दर महिन्याला दोन लाख रूपये घर भत्ता मिळणार आहे. दरवर्षी 34 वेळा मोफत विमानाने प्रवासही आता कंगना राणावत हिला करता येईल. यासोबतच मोफत वैद्यकीय सुविधाही कंगना राणावत हिला मिळणार आहेत. कंगना राणावत ही मोठ्या संपत्तीची मालकीन असून 91.5 कोटी संपत्ती ही कंगना राणावत हिच्याकडे आहे.

कंगना राणावत हिने या लोकसभा निवडणूकीमध्ये काँग्रेस उमेदवाराचा 74 हजार मतांनी पराभव केला. कंगना राणावत आता चित्रपटांनंतर राजकारणात सक्रिय झालीये. कंगना राणावत हिने काही दिवसांपूर्वीच म्हटले की, राजकारण खूप अवघड आहे. चित्रपटांमध्ये काम करणे मला यापेक्षा सोपे वाटते. यानंतर अभिनेत्रीच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसली.