क्रिती सेनॉनने विकले मुंबईतील 4 फ्लॅट! 107 टक्कांचा नफा, एका फ्लॅटची किंमत ऐकून बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने मुंबईतील तिचे चार फ्लॅट विकले आहेत. यामधील दोन फ्लॅट तिच्या आईच्या नाववर आणि एक तिच्या बहिणीच्या नावावर होते. या व्यवहारामध्ये क्रितीला 107 टक्के नफा झाला आहे.

क्रिती सेनॉनने विकले मुंबईतील 4 फ्लॅट! 107 टक्कांचा नफा, एका फ्लॅटची किंमत ऐकून बसेल धक्का
क्रिती सेनॉन
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 13, 2026 | 12:44 PM

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिचा कॉकटेल 2 हा चित्रपट लवकर प्रेकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी क्रिती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. क्रितीने मुंबईमधील तिचे चार फ्लॅट विकले आहेत. तिचे हा चारही फ्लॅट ज्या किंमतीला विकले गेले ती किंतम ऐकून तुम्हाला धक्का बसेल. या विक्रिती क्रितीला गुंतवणुकीच्या 100 पट फायदा झाला आहे.

कुठे होते क्रितीचे फ्लॅट?

महाराष्ट्र इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशनच्या वेबसाइटवरून ‘स्क्वायर यार्ड्स’ने पाहिलेल्या प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन दस्तऐवजांनुसार, क्रिती सेनॉनने बहिणी नूपुर सेनॉन आणि आई गीता सेनॉन यांच्यासोबत असलेल्या मुंबई अंधेरी वेस्ट परिसरातील चार फ्लॅट विकले आहेत. या विक्रीत तिला गुंतवणुकीवर १०० टक्क्यांहून अधिक नफा झाला आहे. हे चारही व्यवहार एप्रिल २०२६ मध्ये नोंदणी झाले आहेत. हे अपार्टमेंट मुंबईतील सर्वात लोकप्रिय आणि प्रीमियम रहेजा क्लासिक (Raheja Classic) या प्रकल्पात आहेत.

रिपोर्ट्सनुसार, गीता सेनॉन यांनी जुलै २०१३ मध्ये १.४० कोटी रुपये देऊन दोन अपार्टमेंट खरेदी केले होते. चार वर्षांनंतर, जून २०१७ मध्ये क्रिती आणि नूपुर यांनी उर्वरित दोन युनिट्स २.९० कोटी रुपयांना खरेदी केले. या प्रॉपर्टीज १३ आणि ९ वर्षे आपल्याकडे ठेवल्यानंतर, कुटुंबाने चारही अपार्टमेंट एकूण ८.८८ कोटी रुपयांना विकले.

प्रत्येक अपार्टमेंटची किंमत

दोन मोठे अपार्टमेंट: प्रत्येकाची किंमत ३.२३ कोटी रुपये.

बिल्ट-अप एरिया: ६०.७८ चौरस मीटर (६५४.२३ चौरस फूट)

कार्पेट एरिया: ५०.६३ चौरस मीटर (५४५ चौरस फूट)

प्रत्येक युनिटसोबत पार्किंग जागा उपलब्ध.

बाकी दोन अपार्टमेंट: प्रत्येकाची किंमत १.२१ कोटी रुपये.

बिल्ट-अप एरिया: २२.८६ चौरस मीटर (२४६.०६ चौरस फूट)

कार्पेट एरिया: १९.०५ चौरस मीटर (२०५ चौरस फूट)

या सर्व व्यवहारांवर स्टॅम्प ड्यूटी आणि रजिस्ट्रेशन शुल्क आकारले गेले.

गुंतवणूक आणि नफा

सेनॉन कुटुंबाने चार प्रॉपर्टीजमध्ये एकूण ₹४.३० कोटी गुंतवणूक केली होती. त्यांना विक्रीतून ₹८.८८ कोटी मिळाले. यात त्यांना सुमारे ₹४.५८ कोटीचा नफा झाला, जो गुंतवणुकीवर १०७ टक्के इतका उत्कृष्ट परतावा आहे.

Follow Us