
Bollywood Actress Madhuri Dixit : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. माधुरी हिने फक्त अभिनय नाही तर, तिच्या नृत्य कलेनं देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता माधुरी राजकारणात प्रवेश करणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यामुळे माधुरी देखील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री असल्यामुळे राजकारणात प्रवेश करेल का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. यावर खुद्द माधुरी हिने मौन सोडलं आहे.
ANI ला दिलेल्या मुलाखतीत माधुरी दीक्षित हिने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली… यावेळी माधुरी हिला राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर माधुरी म्हणाली, ‘याबद्दल मी सध्या निश्चित असं काहीही सांगू शकत नाही. कारण राजकारण माझं काम नाही…. आणि असं मला वाटत देखील नाही… मी एक कलाकार आहे आणि कला क्षेत्रात मला काम करायचं आहे. कलाक्षेत्रात काही बदल घडवायचे असतील तर, मी त्यासाठी प्रयत्न करेल.. मी सध्या स्वतःला कलाकाराच्या भूमिकेत पाहते…’
पुढे माधुरी म्हणाली, ‘मी माझ्या कलाविश्वात आनंदी आहे. राजकारणात येणं हा काही माझा हेतू नाही… कलाकार म्हणून मलाद जे बदल घडवता येतील, ते मी कलाकार म्हणून करेल… राजकारणापेक्षा मला ते फार महत्त्वाचं वाटतं…’ असं देखील माधुरी म्हणाली.
माधुरी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, मोठ्या पडद्यावर स्वतःचं नाव मोठं केल्यानंतर माधुरी हिने स्वतःचा मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दिशेने वळवला आहे. माधुरी आता लवकरच ‘मिसेस देशपांडे’ सीरिजमध्ये झळकणार आहे. सध्या अभिनेत्री सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे…. सीरिजची कथा थ्रीलर ड्रामा भोवती फिरताना दिसणार आहे … 19 डिसेंबर 2025 रोजी सीरिज प्रदर्शित होणार आहे.
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आता मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील माधुरी कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते…