
बॉलिवूडमध्ये घटस्फोट आता सामान्य गोष्ट आहे. आता अभिनेत्री नीलम कोठारी आणि अभिनेता समीर सोनी यांच्या घटस्फोटची चर्चा रंगली आहे. समीर सोनी आणि नीलम कोठारी हिच्या लग्नाला 14 वर्ष पूर्ण झाली आहे. दरम्यान समीर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे सेलिब्रिटी कपलच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये लग्नाबद्दल म्हटलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी समीर आणि नीलम यांचा घटस्फोट होणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
अभिनेत्याच्या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये नीलम आणि समीर यांचा वैवाहिक आयुष्याच्या चर्चा रंगू लागल्या. चर्चांनी जोर घरल्यानंतर समीर याने स्पष्टीकरण देत मोठं वक्तव्य केलं आहे. समीर याने आजचे कपल्स आणि लग्नाबद्दल मोठं वक्तव्य करत, ‘आमच्या वैवाहिक आयुष्यात कोणतीच अडचण नसल्याचं’ स्पष्ट केलं आहे.
आजकालच्या जोडप्यांवर आणि लग्नाच्या पद्धतींवर निशाणा साधताना समीर म्हणाला, ‘जर तुम्हाला श्रीमंत नवरा हवा असेल तर, तुम्हाला सुंदर आणि आकर्षक असणं गरजेचं आहे. तुम्हाला सुंदर पत्नी हवी असेल तर, तुम्हाला पैसे कमवावे लागतील. जर तुम्हाला एक आनंदी आयुष्य हवं असेल तर, सहा महिने एकत्र राहिल्यानंतर लग्नाचा निर्णय घ्यायला हवा..’ अशी अभिनेत्याने पोस्ट केली.
लग्नाबद्दल केलेल्या पोस्टवर स्पष्टीकरण देत अभिनेता म्हणाला, ‘गेल्या 14 वर्षांपासून मी आणि नीलम विवाहित आहोत. आमच्या दोघांमध्ये काहीही वाईट सुरु नाहीये. सर्वकाही उत्तम आहे. मी स्वप्नात देखील नीलमबद्दल असा विचार करु शकत नाही. निराशेसाठी माफी मागतो. मी जे बोललो ते फक्त एक निरीक्षण आहे.’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘आजकाल हे सर्रास पाहायला मिळत आहे. तुम्हाला दिसेल की एका सुंदर स्त्रीचा नवरा दिसायला फारसा सुंदर नसून खूप श्रीमंत असतो. मी फक्त तुम्हाला सांगतोय की आजकाल हेच बघायला मिळतंय. बहुतेक लोकांसाठी, पैशामुळे सुरक्षिततेची भावना येते आणि त्याला अधिक प्राधान्य दिले जात आहे. सध्या सर्वत्र समीर याने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री नीलम कोठारी हिने देखील दोन लग्न केले आहेत. अभिनेत्रीने ऑक्टोबर 2000 मध्ये ऋषी सेठाई यांच्यासोबत पहिलं लग्न केलं होतं. पण अभिनेत्रीचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांचं बिनसलं आणि त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. त्यानंतर नीलम हिने 2011 मध्ये अभिनेता समीर सोनी याच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या दोन वर्षांनंतर दाम्पत्याने एका मुलीला दत्तक घेतलं. तिचं नाव अहाना असं आहे.