
बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे तर चर्चेत असतातच पण त्यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा देखील कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. नीना गुप्ता त्यांच्या खासगी आयुष्यावर आणि सामाजिक मुद्यांवर कायम बोलताना दिसतात. अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी महिलांच्या परिस्थितीवर मोठं वक्तव्य केलं आहे. नीना यांच्या म्हणण्यानुसार, पुरुषांना स्वतंत्र आणि धीट महिला आवडत नाहीत. यावेळी नीना गुप्ता यांनी मोठा खुलासा केला, एका पुरुषासोबत त्यांचा साखरपुडा झालेला. पण नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता म्हणाल्या, ‘धीट महिला पुरुषांना मॅरिज मटेरियल वाटत नाही… अनेक पुरुषांना तर स्वतंत्र महिला आवडत देखील नाहीत. ज्या महिलांना स्वतःचे विचार आहेत. ज्या महिला काम करतात आणि कमावतात. त्यांच्या करियरसोबत एकनिष्ठ असतात. अशा महिलांचा पुरुष तिरस्कार करतात. ज्यांना त्यांच्या हक्कांवर बोलता येतं.’
नीना गुप्ता पुढे म्हणाल्या, ‘मी सर्वसाधारणपणे बोलत आहे, सर्वांबद्दल नाही. पण हे आपल्या 95 टक्के लोकसंख्येसाठी खरं आहे. मी हे वादग्रस्त विधान करण्यासाठी म्हणत नाहीये, तर मी स्वतः माझ्या घरात आणि समाजात ते पाहिले आहे म्हणून म्हणत आहे. माझा साखरपुडा एका तरुणासोबत झाला होता. अंतिम क्षणी त्याने माझी फसवणूक केली. माझ्या मनात बाळाची अपेक्षा होती… सर्व विधी देखील झालेल्या होत्या.’
‘मी माझे कपडे आणि दागिने खरेदी करण्यासाठी दिल्लीत गेलेली… अचानक मला त्याचा फोन आला आणि तो म्हणाला मला लग्न करायचं नाही. मी विचारलं का, तर त्याचं उत्तर होतं मला सायनसचं ऑपरेशन करायचं आहे. पण मला आजपर्यंत कळलं नाही की, लग्न का मोडलं आहे.’
‘मी सतत त्यांच्या आई – वडिलांना विचारत राहिली की काय होत आहे. पण त्यांनी देखील मला काहीही सांगितलं नाही. तो जवळपास सहा महिन्यांनंतर माझ्याकडे परत आला आणि म्हणाला की, मला तुझ्यासोबत लग्न करायतं आहे… तेव्हा मी त्याला लग्नासाठी नकार दिला…’ असं नीना गुप्ता म्हणाल्या.