
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. प्रियांका चोप्राची जबरदस्त अशी फॅन फॉसोइंग बघायला मिळते. निक जोनस याच्यासोबतच्या लग्नानंतर अभिनेत्री विदेशात राहते. मात्र, असे असले तरीही प्रियांका चोप्रा ही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा हिने खास फोटो शेअर केले होते. यावेळी प्रियांका चोप्राच्या चित्रपटाच्या सेटवर निक जोनस हा मुलगी मालती मेरी हिला घेऊन पोहोचला होता. विशेष म्हणजे सेटवर आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवताना प्रियांका चोप्रा ही दिसली. प्रियांका चोप्रा हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे.
आता बॉलिवूडनंतर प्रियांका चोप्रा ही हॉलिवूडकडे वळली आहे. प्रियांका चोप्रा ही भाऊ सिद्धार्थ चोप्रा याच्या लग्नासाठी मुंबईमध्ये दाखल झाली. विशेष म्हणजे लग्नाच्या अगोदरच्या फंक्शनमध्ये जबरदस्त अशा लूकमध्ये प्रियांका चोप्रा ही दिसली. आता प्रियांका चोप्रा हिच्या या लूकची तूफान चर्चा ही रंगताना दिसत आहे.
यावेळी प्रियांका चोप्रा ही शिमरी साडीमध्ये दिसली. यासोबतच प्रियांका चोप्रा हिने अत्यंत महागडे दागिने घातले होते. प्रियांका चोप्रा हिने घातलेल्या या दागिन्यांची किंमत कोट्यावधीच्या घरात आहे. प्रियांका चोप्रा हिने गळ्यात घातलेला हार अत्यंत खास आहे. या हारामध्ये मोती, रूबी, आणि हिरे आहेत.
प्रियांका चोप्रा हिने घातलेल्या या हाराची किंमत तशी फिक्स सांगता येणार नाही. मात्र, रिपोर्टनुसार या हाराची किंमत कोट्यावधीच्या घरात आहे. यासोबतच प्रियांका चोप्रा हिने तिच्या या लूकमध्ये एक खास असे डायमंड ब्रेसलेट देखील कॅरी केले. या डायमंड ब्रेसलेटची किंमत तब्बल 30, 79, 000 असल्याचे सांगितले जाते.
या लूकमध्ये प्रियांका चोप्रा ही जबरदस्त दिसत आहे. विशेष म्हणजे प्रियांका चोप्रा हिचे हे फोटो चाहत्यांना देखील आवडताना दिसत आहेत. प्रियांका चोप्रा हिच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. फोटोसाठी पोझ देताना देखील अभिनेत्री यावेळी दिसली. प्रियांका चोप्रा हिच्या या लूकचे जोरदार काैतुक देखील केले जात आहे.