
Rekha : बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्याबद्दल कोणाला माहिती नसेल… हे अशक्य आहे.. रेखा त्यांच्या सिनेमांमुळे जेवढ्या चर्चेत राहिल्या, तेवढ्याच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिल्या. आज रेखा बॉलिवूडपासून दूर आहेत. पण आज देखील त्यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. रेखा यांच्या खासगी आयुष्यातील अनेक पैलू समोर आले, ते यासिर उस्मान यांच्या ‘रेखा : द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकातून… पुस्तकार रेखा यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक रहस्य आहेत…
‘रेखा : द अनटोल्ड स्टोरी’ पुस्तकानुसार, उद्योजक मुकेश अग्रवाल यांना रेखा प्रचंड आवडत होत्या. पहिल्या भेटीनंतर मुकेश यांनी रेख यांना प्रपोज केला… पहिल्या भेटीच्या बरोबर एक महिन्यानंतर, 4 मार्च 1990 रोजी, मुकेश अग्रवाल रेखा यांची मैत्रीण सुरिंदर कौरसोबत रेखा यांच्या घरी पोहोचले. थोड्या गप्पा झाल्यानंतर, त्यांनी रेखा यांना प्रपोज केलं. रेखा यांनी देखील होकार दिला. दोन्ही कुटुंब त्यावेळी मुंबईत नव्हते, तरीही त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर रेखा आणि मुकेश लग्नासाठी मुंबईतील मुक्तेश्वर मंदिरात पोहोचले. गर्दीमुळे त्यांना मंदिरात प्रवेश करता आला नाही. रात्री उशिरा मुकेश आणि रेखा मुक्तेश्वर मंदिरात पोहोचले तेव्हा पुजारी संजय बोडस झापले होते. त्यांनी पुजाऱ्याला उठवलं आणि रेखा म्हणाल्या मला लग्न करायचं आहे… संजय रेखा यांना ओळखत होते… रेखा यांना पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला…
रेखा मंदिरात कायम दर्शनासाठी यायच्या. रात्री 10.30 वाजता लग्नाच्या विधी पार पडल्या. त्यावेळी रेखा 35 वर्षांच्या होत्या. लग्नानंतर रेखा यांना कळलं की, नवरा बऱ्याच काळापासून नैराश्याने ग्रस्त होता. नवऱ्याच्या मृत्यूनंतर रेखा यांच्यावर विविध आरोप झाले. हा काळ रेखा यांच्यासाठी प्रचंड काठीण काळ होता. त्यानंतर रेखा यांनी कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही…
दरम्यान, अभिनेत्री महिमा चौधरी स्टारर ‘दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी’ सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान रेखा यांनी दुसऱ्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलेलं. त्यांचा व्हिडीओ देखील व्हायरल झालेला. व्हायरल व्हिडीओमध्ये रेखा म्हणालेल्या, ‘लग्न पहिलं असो किंवा दुसरं… लग्न तर मी केलं आहे, जीवनाशी… लग्न हे प्रेमाचं दुसरं नाव आहे. प्रेम आहे तर लग्न आहे आणि लग्न आहे तर प्रेम आहे…’ रेखा यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं.