
मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : अभिनेता सलमान खान स्टारर ‘टायगर 3’ सिनेमा 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात भाईजान मुख्य भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री कतरिना कैफ झोया या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे. एवढंच नाही तर, अभिनेता इमरान हश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘टायगर 3 ‘ सिनेमाची चर्चा सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे रविवार सुट्टीचा दिवस आणि सलमान खान याचा सिनेमा प्रदर्शित होणार म्हटल्यानंतर चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी होणार यात काही शंका नाही.
सलमान खान स्टारर ‘टायगर 3’ सिनेमा प्रदर्शित होणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. एवढंच नाही तर सिनेमाच्या तिकिटांची दमदार ॲडव्हान्स बुकिंग देखील झाली आहे. ‘टायगर 3’ सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगची सुरुवात 4 नोव्हेंबर रोजी झाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘टायगर 3’ सिनेमाची चर्चा सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबर रात्री 8 वाजेपर्यंत ‘टायगर 3’ सिनेमाचे 5 लाख 34 हजार 722 तिकिट विक्री झाले आहे. म्हणजे प्रदर्शनापूर्वीच ‘टायगर 3’ सिनेमाने जवळपास 14.24 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी अद्याप एक दिवस बाकी आहे. म्हणून ‘टायगर 3’ सिनेमा किती कोटी रुपयांचा गल्ला पार करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘टागयर 3’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सिनेमा किती कोटी रुपयांचा गल्ला जमा करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिनेमा विश्लेषक सुमित काडेल यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ‘टायगर 3’ सिनेमा प्रदर्शनानंतर आठ दिवसांत 300 ते 360 कोटी रुपयांपर्यंत कमाई करु शकेल.
सोशल मीडियावर देखील सध्या ‘टायगर 3’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सलमान, कतरिना सिनेमाबद्दल अनेक गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. सलमान खान स्टारर ‘टायगर’ सिनेमाच्या दोन्ही भागांना चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. पण आता ‘टायगर 3’ सिनेमाला प्रेक्षकांकडून किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सलमान खान याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत कायम चाहते असतात. सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. फक्त भारतात नाही तर, जगभरात अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. म्हणून ‘टायगर 3’ सिनेमा किती कोटी रुपयांचा गल्ला जमा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.