
मुंबई | अभिनेता शाहरुख खान लवकरच ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘जवान’ सिनेमाची येणार आहे. किंग खान याच्या आगामी सिनेमाचा प्रिव्ह्यू प्रदर्शिद झाला आहे. सिनेमाचा प्रिव्ह्यू चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. प्रिव्ह्यू प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांच्या मनातील सिनेमाची उत्सुकता अधिक वाढली आहे. सिनेमाच्या प्रिव्ह्यूमध्ये अभिनेता एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. सिनेमातील अभिनेत्याचा नवा लूक तर चाहत्यांना आवडला आहे. पण अभिनेत्याच्या डोक्यावर असलेल्या टॅटूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या सर्वत्र शाहरुख खान याच्या टॅटूची चर्चा रंगत आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्याचा नवीन लूक तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, किंग खान याने गुरुवारी #AskSRK च्या माध्यामातूवन चाहत्यांसोबत संवाद साधला. अभिनेत्याने देखील चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली. पण अभिनेत्याच्या टॅटूची चर्चा सध्या सोशल मीडियावर तुफान रंगत आहे. (shah rukh khan tattoo)
सिनेमाच्या प्रिव्ह्यूमध्ये शाहरुख खान याच्या डोक्यावर डाव्या बाजूला टॅटू दिसत आहे. शाहरुख खान याच्या डोक्यावर असलेल्या टॅटूचा अर्थ तुम्हाला माहितेय का? अभिनेत्याच्या डोक्यावर असलेला टॅटू संस्कृत भाषेत असल्याचं दिसून येत आहे. टॅटूमध्ये ‘माँ जगत जननी’ असं लिहिलं आहे.
‘माँ जगत जननी’ म्हणजे पूर्ण जगाची आई.. किंग खान याच्या डोक्यावर असलेल्या टॅटूची खुलासा खुद्द ट्रेड विश्लेषकांनी केला आहे. फोटो देखील विश्लेषकांनी पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या नव्या सिनेमाची आणि टॅटूची चर्चा रंगली आहे.
अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमा ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेत्री दीपिका पादुकोण, नयनतारा, सान्या मल्होत्रा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘पठाण’ सिनेमानंतर किंग खान याचा ‘जवान’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘पठाण’ सिनेमाप्रमाणेच ‘जवान’ सिनेमात देखील तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. त्यामुळे आता ‘जवान’ सिनेमातून किंग खान प्रेक्षकांचं किती मनोरंजन करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जवान सिनेमात मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘जवान’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असल्यामुळे शाहरुख खान सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.