AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी महिलांचा वापर फक्त इंटिमेसीसाठी करतो…’, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ

अभिनेत्रीने दिग्दर्शकाकडे लग्नाची मागणी केली, पण त्याने दिलेलं उत्तर एकून 'ती' हैराण झाली... सध्या सर्वत्र दिग्दर्शक आणि प्रसिद्ध अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा..

'मी महिलांचा वापर फक्त इंटिमेसीसाठी करतो...', प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ
| Updated on: Jul 14, 2023 | 1:16 PM
Share

मुंबई | सध्या सर्वत्र बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केलेलं एक वक्तव्य तुफान चर्चेत आहे. निर्माते शेखर कपूर यांची पहिली पत्नी सुचित्रा कृष्णमूर्ती (suchitra krishnamoorthi) एकदा म्हणाली होती की तिला दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत लग्न करायचं होतं. अभिनेत्रीने व्यक्त केलेली मनातील गोष्ट ऐकून वर्मा प्रचंड घाबरले होते. एवढंच नाही तर, राम गोपाल वर्मा यांनी सचित्रा कृष्णमूर्ती हिला स्वतःच्या ऑफिसमध्ये देखील बोलावलं होतं. पण तेव्हा घडलेली एक गोष्ट आज अनेक वर्षांनंतर समोर आली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या सर्वत्र सुचित्रा कृष्णमूर्ती आणि राम गोपाल वर्मा यांची चर्चा रंगत आहे.

सुचित्राने तिच्या आत्मचरित्रात राम गोपाल वर्मांना मेसेज पाठवल्याचा उल्लेख केला आहे. ‘तू माझ्यासोबत लग्न करशील का?’ असा मेसेज सुचित्रा हिने दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना पाठवला होता. सुचित्रा आणि राम गोपाल वर्मा यांनी ‘माय वाईफ्स मर्डर’ आणि ‘रण’ या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. तेव्हा सुचित्रा हिने दिग्दर्शकाला लग्नासाठी मागणी घातली होती. ( ram gopal varma)

पण सुचित्रा यांनी केलेली लग्नाची मागणी राम गोपाल वर्मा यांनी फेटाळून लावली. एवढंच नाही तर दिग्दर्शक म्हणाले, ‘मी महिलांचा वापर फक्त इंटिमेसीसाठी करतो. मला महिलांचं शरीर आवडतं. मला महिलांना फक्त पहायलं आवडतं, त्यांना ऐकायला नाही.. म्हणून तू माझ्यापासून शक्य तितकं दूर राहा…’ (entertainment news)

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत सुचित्रा यांनी सांगितलं की, तेव्हा मस्करी केली होती. पण राम गोपाल वर्मा यांनी गांभीर्याने घेतलं होतं. ‘तेव्हा फक्त मी मस्करी केली होती. राम गोपाल वर्मा यांच्यासोबत कोण लग्नाचा विचार करु शकतं? ते अत्यंत उत्तम व्यक्ती आहेत. पण माझ्या एका मेसेजमुळे ते घाबरले होते.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी मेसेज केल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी मला ऑफिसमध्ये बोलावलं आणि म्हणाले, ‘तू एक चांगली मुलगी आहे आणि मी वाईट व्यक्ती आहे. मी त्यांच्याबद्दल विचार करायला नको…’यासाठी मला ते समजावत होते.’ अखेर अभिनेत्रीने ही केवळ मस्करी असल्याचं राम गोपाल वर्मा यांना सांगितलं. सध्या सर्वत्र राम गोपाल वर्मा आणि सुचित्रा कृष्णमूर्ती यांची चर्चा रंगत आहे. राम गोपाल वर्मा बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत.

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.