AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: वेगाचा नवा राजा! अशोक शर्माने या पर्वात सर्वात वेगवान चेंडू टाकला, जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असून राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या अशोक शर्माने विक्रमी चेंडू टाकला आहे. त्याने टाकलेल्या चेंडूच्या वेगाची आता चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊयात नेमकं काय केलं ते...

| Updated on: Apr 04, 2026 | 10:41 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सच्या 23 वर्षीय अशोक शर्माने सर्वात वेगाने चेंडू टाकण्याची किमया केली. यासह त्याने एनरिक नॉर्कियाचा सर्वात वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. नॉर्कियाने 150.9 च्या गतीने चेंडू टाकला होता. पण अशोक शर्मा त्याच्या पुढे निघून गेला आहे. (Photo: @AshokSharma Instagram)

1 / 5
राजस्थान रॉयल्सच्या डावातील 16 व्या षटकातील शेवटचा चेंडू अशोक शर्माने सर्वात वेगाने टाकला. या चेंडूचा वेग ताशी 154.2 किमी प्रतितास इतका होता. हा  यॉर्कर होता आणि ध्रुव जुरेलने त्याचा सामना केला. पण सुदैवाने त्याची विकेट पडली नाही. पण या चेंडूचा स्पीड पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. (Photo: @AshokSharma Instagram)

2 / 5
अशोक शर्माने संपूर्ण सामन्यात आक्रमक गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत 37 धावा देऊन 1 बळी घेतला. त्याचा वेग आणि गोलंदाजीतील व्हेरियशन फलंदाजांना त्रासदायक ठरले. अशोक शर्माचा यॉर्कर आणि हार्ड लेंथ चेंडू डेथ ओव्हरमध्ये प्रभावी ठरले.(Photo: @AshokSharma Instagram)

3 / 5
अशोक शर्मा जयपूरजवळील रामपुरा गावचा रहिवासी आहे. त्याचे वडील शेतकरी आहेत. 17  जून 2002 रोजी जन्मलेला शर्मा शालेय जीवनापासूनच क्रिकेटच्या मैदानावर धडे गिरवत होता. यापूर्वी त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपल्या वेगवान आणि स्विंग गोलंदाजीने प्रभाव पाडला होता. त्यामुळेच त्याची आयपीएल स्पर्धेत निवड झाली.(Photo: @AshokSharma Instagram)

4 / 5
अशोक शर्माला आयपीएल स्पर्धेत 2022 मध्ये केकेआरने 55 लाख रुपयांना विकत घेतले होते. पण खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने 30 लाख रुपयांना घेतलं. पण येथेही त्याला बेंचवरच बसावं लागलं. गुजरात टायटन्सने त्याला 90 लाखांना संघात घेतलं आणि त्याला संधी दिली. त्या संधीचं त्याने सोनं केलं. (Photo: @AshokSharma Instagram)

5 / 5
Follow Us
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....