Ashok Kharat Case | अशोक खरात प्रकरणात नवे आरोप-प्रत्यारोप; दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
भोंदू अशोक खरात प्रकरणात नव्या घडामोडींना वेग आला असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही पुरावे समोर आणत अनेक राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला की, रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक नेते अशोक खरातच्या संपर्कात होते.
भोंदू अशोक खरात प्रकरणात नव्या घडामोडींना वेग आला असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही पुरावे समोर आणत अनेक राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला की, रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक नेते अशोक खरातच्या संपर्कात होते. दमानिया यांनी सांगितले की, त्यांना मिळालेली माहिती त्यांनी यापूर्वी डीजी कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय तसेच एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठवली होती. “मी जेव्हा अशा प्रकरणांवर काम करते, तेव्हा अनेक माहिती माझ्यापर्यंत येते,” असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, या प्रकरणावर संपादिका जयश्री खाडिलकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दमानिया यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली आहे. दमानिया यांनी अपूर्ण माहितीच्या आधारे आरोप करून संबंधितांची बदनामी केल्याचा आरोप खाडिलकर यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोप अधिकच तीव्र झाले आहेत.
Published on: Apr 04, 2026 03:57 PM
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
वालधूनी नदीला महापूर! प्राचीन अंबरनाथ शिवमंदिराकडे जणारा रस्ता बंद
दोन दिवसांवर पालखी... अन् इंद्रायणीने ओलांडली धोक्याची पातळी

