AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन दिवसांवर पालखी... अन् इंद्रायणीने ओलांडली धोक्याची पातळी; चारही पूल पाण्याखाली

दोन दिवसांवर पालखी… अन् इंद्रायणीने ओलांडली धोक्याची पातळी; चारही पूल पाण्याखाली

| Updated on: Jul 06, 2026 | 3:26 PM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आळंदीतील इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडत रौद्ररूप धारण केले आहे. नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने आळंदीतील चारही पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले असून, परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आळंदीतील इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडत रौद्ररूप धारण केले आहे. नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने आळंदीतील चारही पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले असून, परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पुराच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे की, पुलांवरील काही वीज खांब (लाईट पोल) देखील कोसळल्याची घटना घडली आहे. नदीकाठावरील अनेक दुकाने पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे भक्त पुंडलिक मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. तसेच, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराच्या महाद्वाराच्या पायऱ्यांपर्यंतही पुराचे पाणी पोहोचले असून, भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांनंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यापूर्वीच निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात असून, नदीकाठी जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, परिस्थितीवर जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सातत्याने लक्ष ठेवून असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Published on: Jul 06, 2026 03:25 PM

Follow Us
Maharashtra Weather Update : राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, 24 तासात...

Maharashtra Weather Update : राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, 24 तासात..

आमच्या हातात तलवारी आणि तुमचा गळा असेल.. इराणमध्ये मोठा भडका, थेट राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्रीच...

आमच्या हातात तलवारी आणि तुमचा गळा असेल.. इराणमध्ये मोठा भडका, थेट राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्रीच..

Dhamaal 4 : खजिनाच हाती लागला; ‘धमाल 4’च्या कमाईत जबरदस्त वाढ, 9 दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला.

Dhamaal 4 : खजिनाच हाती लागला; ‘धमाल 4’च्या कमाईत जबरदस्त वाढ, 9 दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

चार्ट तयार झाल्यानंतरही मिळू शकते सीट तेही कन्फर्म, रेल्वेचा नवा नियम काय? वाचा सविस्तर.

चार्ट तयार झाल्यानंतरही मिळू शकते सीट तेही कन्फर्म, रेल्वेचा नवा नियम काय? वाचा सविस्तर

32 वर्षांपासून बेपत्ता आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध हिरो; पत्नीने केलं दुसरं लग्न, लेक बनली कोट्यधीश.

32 वर्षांपासून बेपत्ता आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध हिरो; पत्नीने केलं दुसरं लग्न, लेक बनली कोट्यधीश

Live Update : सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे गट मैदानात; मुंबईत आंदोलन करणार.

Live Update : सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे गट मैदानात; मुंबईत आंदोलन करणार