Vadgaon | जोरदार पावसात टेम्पो वाहून गेला! मावळमध्ये थरारक घटना, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, साते गावाजवळ पुराच्या प्रचंड प्रवाहात एक टेम्पो वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुना पुणे–मुंबई महामार्ग देहूरोड ते वडगाव मावळदरम्यान अनेक ठिकाणी पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. काही वाहनचालकांनी धोका पत्करून पाण्यातून वाहने नेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी साते गावाजवळ एक टेम्पो पुराच्या वेगवान प्रवाहात वाहून गेला.
टेम्पोमध्ये किती जण प्रवास करत होते किंवा कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी रवाना झाली असून, शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे आणि दळणवळण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून, पुणे आणि मुंबईदरम्यानचा संपर्कही विस्कळीत झाला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Published on: Jul 06, 2026 01:15 PM
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब