AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs RR : तुषार देशपांडेची कडक बॉलिंग, राजस्थानचं शेवटच्या ओव्हरमध्ये ‘कल्याण’, गुजरात विरुद्ध 6 धावांनी विजय

Gujarat Titans vs Rajasthan Royals Match Result IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याने राशिद खान याच्यासारख्या कसलेल्या फलंदाजासमोर 10 धावांचा यशस्वी बचाव करत टीमला विजय मिळवून दिला.

GT vs RR : तुषार देशपांडेची कडक बॉलिंग, राजस्थानचं शेवटच्या ओव्हरमध्ये 'कल्याण', गुजरात विरुद्ध 6 धावांनी विजय
Tushar Deshpande GT vs RRImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 05, 2026 | 3:36 PM
Share

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामात (IPL 2026) रविवारी 4 एप्रिलला डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने होम टीम गुजरात टायटन्सवर 6 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. राजस्थानने या 19 व्या मोसमातील नवव्या सामन्यात गुजरातसमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. गुजरातनेही या धावांचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूपर्यंत लढत दिली. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. गुजरातला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज होती. मात्र कल्याणच्या तुषार देशपांडे याने कमाल केली. तुषारने या 10 धावांचा यशस्वी बचाव केला. तुषारने अवघ्या 4 धावा दिल्या. त्यामुळे गुजरातला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 204 धावांपर्यंतच पोहचता आलं. राजस्थानने अशाप्रकारे सामना जिंकला. राजस्थानचा हा सलग आणि एकूण दुसरा विजय ठरला.

राजस्थानची बॅटिंग

राजस्थानच्या बाजूने या सामन्यात नाणेफेकीचा कौल लागला. रियान पराग याने बॅटिंगचा निर्णय घेतला. राजस्थानने 200 पार मजल मारली. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 210 धावा केल्या. राजस्थानसाठी ध्रुव जुरेल याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. ध्रुवने 42 बॉलमध्ये 75 रन्स केल्या. ध्रुवने या खेळीत 5 चौकार आणि 5 षटकार लगावले. ओपनर यशस्वी जैस्वाल याने अर्धशतक झळकावलं. यशस्वीने 55 रन्स केल्या. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने 31 रन्स केल्या. डोनोवन फेरेरा याने 18 धावा जोडल्या.

गुजरातची अप्रतिम सुरुवात

गुजरातच्या सलामी जोडीने विजयी धावांचा पाठलाग करताना टीमला चाबूक सुरुवात करुन दिली. साई सुदर्शन आणि कुमार कुशाग्र या दोघांनी 78 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. मात्र त्यानंतर राजस्थानने गुजरातला ठराविक अंतराने झटके दिले. गुजरातसाठी साईने 44 चेंडूत 73 धावा केल्या. कुमार कुशाग्र याने 18 धावा जोडल्या. अनुभवी फंलदाज जोस बटलर याने 26 रन्सचं योगदान दिलं. अखेरच्या टप्प्यात राशीद खान आणि कगिसो रबाडा या दोघांनी गुजरातला 18 ओव्हरपर्यंत गुजरातला 196 धावांपर्यंत आणून ठेवलं.

तुषारची धारदार बॉलिंग

सामना रंगतदार स्थितीत

राशीद खान आणि रबाडाने अखेरच्या क्षणी फटकेबाजी करुन सामना रंगतदार स्थितीत आणून ठेवला. गुजरातला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 15 धावांची गरज होती. जोफ्रा आर्चर याने 19 व्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्या.  त्यामुळे गुजरातला शेवटच्या 6 बॉलमध्ये 10 रन्स हव्या होत्या. मात्र कल्याणच्या तुषार देशपांडे याने फक्त 4 धावाच दिल्या. राजस्थानने अशाप्रकारे हा सामना 6 विकेट्सने आपल्या नावावर केला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...