Baramati Election 2026 | बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
अजित पवार यांच्या निधनानंतर आता बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार असल्याचं मातोश्रीवरून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर आता बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार असल्याचं मातोश्रीवरून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं, त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. आता विधानसभेचं सदस्यत्व मिळावं यासाठी सुनेत्रा पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून पोट निवडणूक लढवणार आहेत. मात्र दुसरीकडे या मतदारसंघात काँग्रेसने आपला उमेदवार उभा करण्याचं जाहीर केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.
या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पाठिंबा द्यावा, यासाठी सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. परंतु या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Published on: Apr 04, 2026 04:15 PM
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील

