Suniel Shetty | लग्नाच्या काही दिवसांनंतर सुनील शेट्टी याने जावयाला दिली सक्त ताकीद! मोठं कारण समोर
के.एल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्यामध्ये असं झालं तरी काय? ज्यामुळे अभिनेता सुनील शेट्टी याने जावयाला दिली सक्त ताकीद, तर लेकीला दिला सल्ला...

मुंबई | अभिनेता सुनील शेट्टी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अभिनेता कायम मुलाखतींच्या माध्यमातून स्वतःबद्दल आणि कुटुंबाबद्दल महत्त्वाच्या गोष्टी सांगत असतो. आता देखील नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुनील शेट्टी याने मुलगी अथिया शेट्टी आणि जावई के.एल. राहुल यांच्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सुनील शेट्टी आणि पत्नी मानी शेट्टी यांच्या लग्नाला आज अनेक वर्ष झाली आहेत. पण दोघांमध्ये असलेलं प्रेम आजही कमी झालेलं नाही. अशात आपल्या अनुभवातून सुनील शेट्टी याने लेकीला सल्ला आणि जावयाला सक्त ताकीद दिली आहे. सध्या सर्वत्र सुनील शेट्टी आणि त्यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुनील शेट्टी याने लेक अथिया हिला पतीसोबत असलेलं नातं कसं सांभाळावं यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. संसाराबद्दल लेकीला सल्ला देत अभिनेता म्हणाला, ‘अथिया हिला तिच्या पतीवर पूर्ण विश्वास असयला हवा. केएल राहुल एक एथलीट आहे म्हणून त्याला कामासाठी सतत देशा बाहेर जावं लागतं. तो कायम अथिया सोबत राहू शकत नाही..’
‘केएल राहुल याला सतत बाहेर जावं लागत असल्यामुळे अथियाने पतीवर विश्वास ठेवायला हवा. कारण अभिनेत्याच्या आयुष्यात ज्याप्रकारे उतार – चढाव असतात, त्याचप्रकारे एका एथलीट्सच्या आयुष्यात देखील अनेक चढ – उतार असतात.’ असा सल्ला सुनील शेट्टी याने लेकीला दिला. तर जावयाला मात्र सक्त ताकिद अभिनेत्याने दिली.
मुलाखतीत सुनील शेट्टी जावई केएल राहुल याला म्हणाला, ‘इतकाही चांगला नको राहूस की आम्ही तुझ्यासमोर लहान वाटू. इतकं चांगलं बनू नको की लोकं तुला चांगुलपणाची व्याख्या समजतील. राहुल स्वाभावाने प्रचंड उत्तम व्यक्ती आहे. मी अथिया हिला कायम सांगतो की, तू प्रचंड भाग्यशाली आहेस, तुला केएल राहुल याच्यासारख्या व्यक्ती जोडीदार म्हणून भेटला आहे.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त केएल राहुल याची चर्चा रंगत आहे.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. २०२३ मध्ये केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी लग्न केलं. ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह सोहळा पार पाडला. सुनील शेट्टी याच्या खंडाळा याठिकाणी असलेल्या फार्म हाऊसमध्ये केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचं लग्न झालं. लग्नानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
