AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : टीम इंडियाकडे सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी, श्रीलंका रोखण्यात यशस्वी ठरणार?

India Women vs Sri Lanka Women 3rd T20I : भारताने श्रीलंकेला मात करत विशाखापट्टणममध्ये झालेल्या पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला. भारताने अशाप्रकारे या मालिकेत एकतर्फी आघाडी घेतली आहे.

IND vs SL : टीम इंडियाकडे सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी, श्रीलंका रोखण्यात यशस्वी ठरणार?
Chamari Athapaththu and Harmanpreet KaurImage Credit source: Bcci
| Updated on: Dec 24, 2025 | 11:17 PM
Share

वूमन्स टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप विजयानंतर आपला दबदबा कायम ठेवला आहे. टीम इंडिया सध्या मायदेशात श्रीलंकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळत आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात या मालिकेत अप्रतिम सुरुवात केली आहे. महिला ब्रिगेडने या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. भारताने 21 आणि 23 डिसेंबरला विशाखापट्टणममध्ये झालेल्या सामन्यात श्रीलंकेवर सहज आणि सोपा विजय मिळवला. भारतान यासह या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडी घेतली आहे.  भारताने या सलग विजयांसह मालिकेवर हात ठेवला आहे.

श्रीलंकेसमोर दुहेरी आव्हान काय?

उभयसंघातील मालिकेच्या दृष्टीने तिसरा सामना (India Women vs Sri Lanka Women 3rd T20I) फार निर्णायक आणि अटीतटीचा असणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून विजयी हॅटट्रिक करण्यासह मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर श्रीलंकेला मालिकेत कायम रहायचं असेल तर कोणत्याही स्थितीत हा तिसरा सामना जिंकावा लागणार आहे. श्रीलंकेसमोर या सामन्यात विजयाचं खातं उघडून भारताला मालिका जिंकण्यापासून रोखण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतीय संघाचा सलग 2 विजयासह विश्वास दुणावलेला आहे.

श्रीलंका टीम इंडियाला रोखण्यात यशस्वी ठरणार?

चमारी अट्टापट्टू हीच्या नेतृत्वात श्रीलंकेचे फलंदाज पहिल्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरले. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेला दोन्ही सामन्यात 130 धावांपर्यंतही पोहचता आलं नाही. त्यामुळे भारताने विजयासाठी मिळालेलं आव्हान हे सहज पूर्ण केलं. भारताने पहिला सामना हा 8 तर दुसरा सामना 7 विकेट्सने जिकंला. पहिल्या सामन्यात जेमिमाह रॉड्रिग्स हीने अर्धशतक करत विजयात योगदान दिलं. तर ओपनर शफाली वर्मा हीने नाबाद अर्धशतक करुन भारताला सलग दुसरा विजय मिळवून दिला. त्यामुळे कॅप्टन हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हीची महिला ब्रिगेड मालिका विजयासाठी सज्ज आहे. आता तिसऱ्या सामन्यात मालिकेचा निकाल लागतो की श्रीलंका पलटवार करण्यात यशस्वी ठरते? यासाठी निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा सामना कधी आणि कुठे?

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका वूमन्स यांच्यातील तिसरा टी 20I सामना हा शुक्रवारी 26 डिसेंबरला होणार आहे. सामन्याचं आयोजन हे तिरुवनंतरुपममधील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.