AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहली आणि रोहित शर्माचा व्हिडीओ पोस्ट करणं बीसीसीआयला पडलं महागात, झालं असं की..

देशांतर्गत क्रिकेटला गेल्या काही वर्षात बीसीसीआयने प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळे दिग्गज खेळाडू या स्पर्धांमध्ये खेळताना दिसत आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली यांनीही देशांतर्गत स्पर्धेत भाग घेतला. पण त्यांचा एक व्हिडीओमुळे बीसीसीआयवर नाराजी वाढली आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्माचा व्हिडीओ पोस्ट करणं बीसीसीआयला पडलं महागात, झालं असं की..
विराट कोहली आणि रोहित शर्माचा व्हिडीओ पोस्ट करणं बीसीसीआयला पडलं महागात, झालं असं की..Image Credit source: PTI
| Updated on: Dec 24, 2025 | 11:03 PM
Share

देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धा संपल्यानंतर आता विजय हजारे ट्रॉफीचा आनंद क्रीडाप्रेमींना लुटण्यास मिळत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दिग्गज क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळत आहे. पहिल्याच सामन्यात या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी शतकी खेळी केली. त्यांच्या शतकी खेळीने संघाला फायदा झाला. विराट कोहलीमुळे दिल्लीने, रोहित शर्मामुळे मुंबईने विजयाची चव चाखली आहे. त्यांची फटकेबाजीचे अपडेट प्रेक्षकांना वेळोवेळी मिळत होते. तशी त्यांची अस्वस्थता वाढत होती. कारण प्रत्यक्ष पाहण्याची अनुभूती काही मिळत नव्हती. मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाच हा आनंद घेता येत होता. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये संतापाची लाट होती. कारण या सामन्यांच लाईव्ह प्रसारण किंवा ऑनलाइन स्ट्रीमिंगही नव्हतं. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी श्रीमंत गणल्या जाणाऱ्या बीसीसीआयवर टीकेची झोड उठवली आहे. त्यात बीसीसीआयच्या नफ्याची बातमी समोर येताच त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

बीसीसीआयला 3358 कोटींचा फायदा

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयने 2025 या वर्षात 3358 कोटींची कमाई केली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने 2025 या वर्षात ड्रीम इलेव्हनशी असलेला करार मोडला. तरीही बीसीसीआयला इतका फायदा झाला आहे. बीसीसीआयने अपोलो टायर्स आणि एडिडाससारख्या दिग्गद कंपन्यांसोबत करार केला आहे. दुसरीकडे, बीसीसीआयला आयसीसीकडून नफ्यात मात्र तूट झाली आहे. बीसीसीआयला आयसीसीच्या एकूण कमाईतून 38.5 टक्के मिळतात. इतर क्रिकेट बोर्डाच्या तुलनेत ही कमाई अधिक आहे. तोटा सहन करूनही बीसीसीआयला 2025-26 या वर्षात 8963 कोटींची कमाई करू शकते.

बीसीसीआयच्या कमाईवरून संताप

बीसीसीआयची कमाईवर क्रीडाप्रेमींचा संताप होण्याचं कारण काय असावं? तर क्रीडाप्रेमींचं म्हणणं इतकंच आहे की इतके कोटी कमवता पण देशांतर्गत क्रिकेट लाईव्ह दाखवण्यासाठी योजना नाही याचं आश्चर्य आहे. गल्लीबोलातील टेनिस क्रिकेटही हल्ली लाईव्ह दाखवलं जातं. बीसीसीआयला लाज वाटेल इतकी त्याची स्पष्टता असते. विजय हजारे ट्रॉफी विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळत असलेल्या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं नाही. बीसीसीआयने त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर आणखी संताप झाला. कारण त्याची क्वॉलिटी बघण्यासारखी नव्हती. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी बीसीसीआय हा पैसा नेमका कशासाठी वापरते असा प्रश्न उपस्थित केला आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.