AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs CSK Live Streaming : चेन्नईसमोर पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान, आरसीबी सलग दुसऱ्या विजयासाठी तयार, कोण मिळवणार 2 गुण?

Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings IPL 2026 Live Scorecard: चेन्नई 19 व्या मोसमातील आपल्या पहिल्या 2 सामन्यात विजय मिळवण्यात अपयशी ठरली. त्यामुळे चेन्नईचा आता बंगळुरुसमोर 2 गुणांसाठी चांगलाच कस लागणार आहे.

RCB vs CSK Live Streaming : चेन्नईसमोर पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान, आरसीबी सलग दुसऱ्या विजयासाठी तयार, कोण मिळवणार 2 गुण?
RCB vs CSK IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 05, 2026 | 3:55 PM
Share

चेन्नई सुपर किंग्स आयपीएल स्पर्धेतील दुसरी सर्वात यशस्वी टीम आहे. चेन्नईने मुंबई इंडियन्सनंतर 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. मात्र चेन्नई 19 व्या मोसमात (IPL 2026) दिग्गज अनुभवी खेळाडू महेंद्रसिंह धोनी याच्याशिवाय बेहाल असल्याचं चित्र आहे. चेन्नईला ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. तर गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने या पर्वात विजयी सुरुवात केली आहे. रविवारी 5 एप्रिलला आरसीबी विरुद्ध सीएसके यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईचा हा तिसरा तर आरसीबीचा दुसरा सामना असणार आहे. चेन्नईसमोर या सामन्यात पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान असणार आहे. तर आरसीबी सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यात कोण विजेता ठरतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. आरसीबी-चेन्नई सामन्याची वेळ आणि इतर माहिती जाणून घेऊयात.

आरसीबी विरुद्ध सीएसके सामना कधी?

आरसीबी विरुद्ध सीएसके सामना रविवारी 5 एप्रिलला होणार आहे.

आरसीबी विरुद्ध सीएसके सामना कुठे?

आरसीबी विरुद्ध सीएसके सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु इथे खेळवण्यात येणार आहे.

आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.

आरसीबी विरुद्ध सीएसके हेड टु हेड रेकॉर्ड्स

बंगळुरु विरुद्ध चेन्नई यांच्यात आतापर्यंत एकूण 35 वेळा आमनासामना झाला आहे. चेन्नईने 35 पैकी सर्वात जास्त सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. चेन्नईने बंगळुरुला 21 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर बंगळुरुने चेन्नईवर 13 वेळा मात केली आहे. तर उभयसंघातील एका सामन्याचा निकाल लागला नाही.

ऋतुराज कर्णधार म्हणून पहिल्या दोन्ही सामन्यात यलो आर्मीला विजयी करण्यात अपयशी ठरला. तसेच ऋतुराजला दोन्ही सामन्यात बॅटिंगने काही खास करता आलं नाही. त्यामुळे ऋतुराजसमोर कर्णधार आणि फलंदाज म्हणून आणखी भरीव कामगिरी करण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे.  तर दुसऱ्या बाजूला गतविजेत्या संघाचा कॅप्टन रजत पाटीदार याने त्याच्या नेतृत्वात 19 व्या पर्वातही आरसीबीला विजयी सुरुवात करुन दिली. त्यामुळे आरसीबाचा सलग दुसरा सामना जिंकणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...