AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs LSG Live Streaming : हैदराबाद दुसऱ्या विजयसाठी सज्ज, लखनौ खातं उघडणार? कोण जिंकणार?

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants IPL 2026 Live Scorecard : सनरायजर्स हैदराबादचा रविवारी सामना जिंकून विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर लखनौ विजयाचं खातं उघडण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

SRH vs LSG Live Streaming : हैदराबाद दुसऱ्या विजयसाठी सज्ज, लखनौ खातं उघडणार? कोण जिंकणार?
SRH vs LSG IPLImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 05, 2026 | 3:43 PM
Share

जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत टी 20 लीग अशी ओळख असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाचा (IPL 2026) थरार सुरु आहे. या पर्वात एकूण 8 डबल हेडर सामने होणार आहेत. त्यातील दुसऱ्या डबल हेडरचं आयोजन हे रविवारी 5 एप्रिलला करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. पॅट कमिन्स याच्या अनुपस्थितीत इशान किशन हैदराबादचं नेतृत्व करणार असल्याचं निश्चित आहे. तर ऋषभ पंत याच्या खांद्यावर लखनौच्या कर्णधारपदाची धुरा आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना कधी?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना रविवारी 5 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना कुठे?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याचा थरार राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद इथे रंगणार आहे.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होणार आहे.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.

लखनौची पराभवाने सुरुवात

हैदराबादचा हा या मोहिमेतील तिसरा तर लखनौचा दुसरा सामना असणार आहे. लखनौची या मोहिमेत पराभवाने सुरुवात झाली. लखनौचा दिल्ली कॅपिट्ल्सने 1 एप्रिलला 6 विकेट्सने धुव्वा उडवला. त्यामुळे कॅप्टन ऋषभ पंत याच्यासमोर लखनौला मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात विजयी करण्याचं आव्हान असणार आहे. अशात ऋषभ नेतृत्वासह फलंदाज म्हणून काय योगदान देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तसेच लखनौप्रमाणे हैदराबादचीही या मोसमात पराभवाने सुरुवात झाली. हैदराबादने खेळलेल्या 2 पैकी 1 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एकदा पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादला आपल्या मोहिमेतील पहिल्या सामन्यात 28 मार्चला आरसीबी विरुद्ध 6 विकेट्सने सामना गमवावा लागला. मात्र हैदराबादने दुसऱ्या सामन्यात  कमबॅक केलं.  हैदराबादने 2 एप्रिलला दुसऱ्या सामन्यात जोरदार मुसंडी मारत विजयाचं खातं उघडलं. हैदराबादने केकेआरवर 65 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे हैदराबाद ही विजयी घोडदौड कायम राखण्यात यशस्वी होणार का? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...