‘हीरामंडी’साठी भन्साळींनी भाचीला दिले इतके पैसे, आकडा अखेर समोर आलाच

Sharmin Segal Fees : शर्मिन सेहगल 'हीरामंडी' सीरिजमुळे होतेय ट्रोल, भूमिकेसाठी भन्साळी यांनी भाचीला दिले इतके पैसे.... आकडा अखेर समोर आलाच... सध्या सर्वत्र फक्त अभिनेत्री आणि तिला मिळालेल्या फीची चर्चा...

हीरामंडीसाठी भन्साळींनी भाचीला दिले इतके पैसे, आकडा अखेर समोर आलाच
| Updated on: May 19, 2024 | 3:06 PM

अभिनेत्री शर्मिन सेहगल हिने दिग्दर्शक संजय लिला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ वेब सीरिजमध्ये आलमझेब भूमिका साकारली आहे. सीरिजमध्ये शर्मिन हिचे अनेक सीन आहेत. पण अभिनेत्री तिच्या अभिनयामुळे ट्रोल करण्यात येत आहे. अभिनेत्रीचे माना भन्साळी यांनी महत्त्वाची भूमिका दिली असली तरी, शर्मिन हिला भूमिकेला योग्य न्याय देता आलेला नाही.. अशी चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगलेली आहे. हीरामंडीतील तवायफ महिलेची भूमिका साकारल्यानंतर शर्मिन हिला एक्सप्रेशनलेस.. अभिनेत्री असल्याचं चाहते म्हणत आहेत… पण या भूमिसाठी भन्साळी यांनी मोठी रक्कम मोजली आहे.

सांगायचं झालं तर, शर्मिन हिने याआधी देखील सिनेमांमध्ये काम केलं. हीरामंडी सिनेमासाठी अभिनेत्रीला 35 लाख रुपये मानधन देण्यात आलं आहे. तर अभिनेत्री संजीदा शेख हिची लोकप्रियता आणि प्रसिद्धी अधिक असून देखील 40 लाख रुपये मानधन दिलं. जर सीरिजमध्ये संजीदा हिला आणखी काही सीन देण्यात आले असते तर, कथा दमदार झाली आहे.

 

 

शर्मिन आणि संजीदा यांच्या शिवाय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला 2 कोटी मानधन देण्यात आलं आहे. तर अभिनेत्री मनिषा कोईराला हिने 1 कोटी मानधन घेतलं आहे. अभिनेत्री ऋचा चड्ढा हिच्या मानधनाबद्दल सांगायचं झालं तर, तिला देखील 1 कोटी मानधन देणायात आलं.

सध्या सर्वत्र सीरिजची चर्चा रंगली आहे. पण या सर्वांत अभिनेत्री शार्मिन सेहगलला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातंय. संपूर्ण सीरिजमध्ये तिच्या चेहऱ्यावर काही विशेष हावभाव नव्हते आणि तिला आलमजेबची भूमिका जमली नाही, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

शर्मिन हिचं करियर

शर्मिन हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मलाल’ सिनेमातून करियरला सुरुवात केली. पण अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करु शकली नाही. शर्मिन तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. शार्मिनने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमन मेहताशी लग्न केलं.

शर्मिन सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.