
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सतत चर्चेत आहे. शत्रुघ्न सिन्हा यांची लेक अभिनेता जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करणार असल्याचे कळताच लोकांनी सोनाक्षीला टार्गेट केले. हेच नाही तर तिला खडेबोलही सुनावण्यात आले. जहीर इक्बालसोबत लग्न केल्यानंतर सोनाक्षी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी आणि जहीर विदेशात गेले होते. यावेळी खास वेळ एकमेकांसोबत घालवताना दिसले. जहीरसोबतच्या लग्नानंतर पहिल्यांदाच सोनाक्षी दोघांच्या नात्याबद्दल बोलताना दिसतंय. सोनाक्षी जहीर इक्बाल याच्यासोबत त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत राहते. जहीरने तिला बाहेर राहण्याची ऑफर दिली होती. मात्र, सोनाक्षीला त्याच्या कुटुंबासोबतच राहायच होते. यादरम्यान सध्या सोशल मीडियावर सोनाक्षी आणि जहीरचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे.
सोनाक्षी सिन्हा बराचवेळ घराबाहेर उभी आहे. मात्र, घराच्या आतमध्ये असतानाही जहीर इक्बाल सोनाक्षीसाठी दरवाजा अजिबात उघडत नाही. सोनाक्षी सिन्हा दरवाज्याबाहेर ताटकळत उभी आहे. कॅमेऱ्यातून सोनाक्षी सिन्हा हिची अवस्था जहीर इक्बाल बघत आहे. मात्र, तरीही दरवाजा उघडत नाही. उलट तो मस्तपैकी हसताना दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा चांगलीच वैतागली आहे. सोनाक्षी हिचा ओरडण्याचा आवाज ऐकून चक्क शेजारीही घराबाहेर आले.
सोनाक्षी घराबाहेर गोंधळ घालते. सोनाक्षीचा आरडाओरड ऐकून चक्क शेजारीही घराबाहेर आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र, तरीही अजिबात दरवाजा जहीर इक्बाल उघडत नाही. सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत मजाक करताना जहीर दिसत आहेत. आता हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. मात्र, लोकांना हा व्हिडीओ फार आवडलेला दिसत नाही. लोक या व्हिडीओवर सतत कमेंट करत आहेत.
एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, तुझ्यासोबत असेल व्हायला पाहिजे… म्हणजे जहीरने सोनाक्षीला घराबाहेर ठेवल्याचे योग्य केल्याचे त्या कमेंटमध्ये म्हणण्यात आले. सोनाक्षी आणि जहीर इक्बाल यांचे अशाप्रकारचे व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दोघेही एकमेकांसोबत मजाक मस्ती करताना कायमच दिसतात.