AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाक्षी सिन्हा हिने लग्नात का घातली 44 वर्ष जुनी साडी? इतक्या पैशांसाठी अभिनेत्रीने…

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. नुकताच सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

सोनाक्षी सिन्हा हिने लग्नात का घातली 44 वर्ष जुनी साडी? इतक्या पैशांसाठी अभिनेत्रीने...
sonakshi sinha
| Updated on: Jun 24, 2024 | 4:46 PM
Share

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही तिच्या लग्नामुळे जोरदार चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. झहीर आणि सोनाक्षी सिन्हा गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. सोनाक्षी आणि झहीरने सिव्हील मॅरेज केले. झहीरसोबतच्या लग्नासाठी कुटुंबिय सोनाक्षीवर नाराज असल्याचीही चर्चा होती. मात्र, सही करताना सोनाक्षी सिन्हा हिने आपल्या वडिलांचा हात पकडल्याचे फोटोंमध्ये स्पष्ट दिसतंय. यासोबतच सोनाक्षीच्या लग्नानिमित्त रामायण हा शत्रुघ्न सिन्हा यांचा बंगलाही खास सजवण्यात आला.

सोनाक्षी सिन्हा हिचा लग्नात अत्यंत जबरदस्त असा लूक दिसत होता. सोनाक्षी सिन्हा हिने सिव्हील मॅरेजच्या वेळी अत्यंत खास अशी साडी घातली होती. सोनाक्षी सिन्हा हिने तब्बल 44 वर्षांपूर्वीची साडी घातली होती. सोनाक्षी सिन्हाने घातलेली ही साडी तिच्या आईची आहे. विशेष म्हणजे ही साडी सोनाक्षी सिन्हाची आई पूनम सिन्हा यांनी त्यांच्या लग्नात घातली होती.

याच साडीवर पूनम सिन्हा यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत सातफेरे घेतले होते. त्यानंतर पार्टीमध्येही सोनाक्षी सिन्हा हिने लाल रंगाची अत्यंत खास अशी साडी घातली. सोनाक्षीने घातलेली ही साडी अत्यंत महागडी आहे. सोनाक्षी सिन्हाने घातलेली ही साडी 78,000 हजारांची आहे. या साडीसोबतच तिने अत्यंत खास असा मेकअपही केला.

हेच नाही तर सोनाक्षी सिन्हा हिने लग्नामध्ये घातलेली दागिने देखील तिच्या आईचेच आहेत. सोनाक्षी सिन्हा हिचे दोन्ही भाऊ लव आणि कुश हे लग्नामध्ये उपस्थित होते. मात्र, लग्नाच्या अगोदरच्या कोणत्याही कार्यक्रमात लव आणि कुश हे सहभागी झाले नव्हते. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नातील लव आणि कुशचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

बहिणीच्या लग्नात लव आणि कुश सहभागी झाले. मात्र, ते बहिणीच्या आनंदात नक्कीच सहभागी नव्हते. त्यांनी भावाच्या कोणत्याच विधी देखील केल्या नाहीत. सोनाक्षी सिन्हा हिच्यावर लव आणि कुश नाराज असल्याची देखील जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. मुळात म्हणजे सुरूवातीपासून सिन्हा कुटुंबियांना सोनाक्षी सिन्हाचा हा लग्नाचा निर्णय अजिबातच आवडला नव्हता.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता