श्रीदेवीच्या या चित्रपटापुढे ‘सैयारा’ चित्रपट फेल, शेवटचा सीन पाहून डोळ्यात येईल पाणी, 42 वर्षांपूर्वी रचला इतिहास

बॉलिवूडमधील असा एक चित्रपट ज्यामधील शेवटचा सीन पाहताना आजही प्रेक्षकांच्या डोळ्यात येते पाणी. श्रीदेवी यांचा हा चित्रपट सैराया चित्रपटाला कथेमध्ये देतो टक्कर.

श्रीदेवीच्या या चित्रपटापुढे सैयारा चित्रपट फेल, शेवटचा सीन पाहून डोळ्यात येईल पाणी, 42 वर्षांपूर्वी रचला इतिहास
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 19, 2026 | 5:28 PM

Bollywood Movies : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, जे प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. ज्यामध्ये त्यांची कथा आणि त्यामधील कलाकार हे देखील प्रचंड प्रसिद्ध झाले. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याची कथा ‘सैयारा’ चित्रपटा सारखी होती.

दरम्यान, आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव ‘सदमा’ आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच हिट ठरला. 8 जुलै 1983 रोजी प्रदर्शित झालेला या चित्रपटाचे दिग्दर्शक बालू महेंद्र होते. या चित्रपटात श्रीदेवी आणि कमल हासन मुख्य भूमिकेत होते. लीला मिश्रा यांच्यासारख्या कलाकारांनी छोट्या-छोट्या भूमिका साकारत चित्रपट अधिक जिवंत केला.

ही कथा आहे एका तरुण, देखण्या मुलीची जी एका अपघातानंतर आपली स्मृती गमावते. मानसिकदृष्ट्या ती पुन्हा पाच वर्षांच्या लहान मुलीसारखी वागू लागते. आपल्या श्रीमंत कुटुंबापासून दूर गेलेली ही मुलगी एका साध्या आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात येते. तो तिची काळजी घेतो. तिला जपतो आणि हळूहळू तिच्यावर मनापासून प्रेम करू लागतो. तिच्यासाठी तोच तिचं संपूर्ण विश्व बनतो.

निष्पाप प्रेमाची वेदनादायक कहाणी

चित्रपटात श्रीदेवीची निरागसता, तिचं वागणं आणि कमल हासन यांचं शांत, संयमी पण खोलवर जाणारं प्रेम प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करतं. हा चित्रपट केवळ प्रेमकहाणी नाही तर त्याग, मूक वेदना आणि अपूर्णतेची जाणीव करून देणारा अनुभव आहे.

‘सदमा’ चित्रपटाचा क्लायमॅक्स भारतीय सिनेमातील सर्वात भावनिक क्लायमॅक्सपैकी एक मानला जातो. चित्रपटाची कथेमध्ये श्रीदेवीची स्मृती परत येते. ती पुन्हा आपल्या खऱ्या आयुष्यात परतते पण त्या प्रवासात तिला कमल हासन यांना विसरून जाते. ती आपल्या कुटुंबासोबत ट्रेनमध्ये बसून निघून जाते आणि कमल हासन दूर उभा राहून तिला पाहत राहतात.

मुळात या सीन शेवट अगदी साधा ठेवण्यात आला होता. स्क्रिप्टनुसार, श्रीदेवी ट्रेनमध्ये बसते आणि कमल हासन शांतपणे तिला निरोप देतात. पण कमल हासनला हा शेवट खूप वेगळा वाटला. त्यांना वाटलं की या नात्याची तीव्रता आणि वेदना अजून खोलवर पोहोचायला हव्यात. कमल हासन यांच्या या अत्यंत प्रभावी अभिनयामुळे ‘सदमा’चा क्लायमॅक्स इतिहासात अजरामर झाला. आजही हा सीन पाहताना प्रेक्षकांचे डोळे पाणावतात.