Alok Nath यांच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप; आता काय करतात ‘संस्कारी बाऊजी’?

'मी टू' प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेले बॉलिवूडचे ‘संस्कारी बाऊजी’ आता आहेत तरी कुठे? झगमगत्या विश्वापासून दूर आलोक नाथ आता काय करतात?

Alok Nath यांच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप; आता काय करतात ‘संस्कारी बाऊजी’?
| Updated on: May 23, 2023 | 5:07 PM

मुंबई : बॉलिवूडचे ‘संस्कारी बाऊजी’म्हणजे अभिनेते आलोक नाथ गेल्या काही वर्षांपासून झगमगत्या विश्वापासून दूर आहेत… आलोक नाथ यांच्यावर निर्मात्या आणि लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला होता. ज्यामुळे आलोक नाथ यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली होती.. एवढंच नाही तर २०१८ मध्ये ‘संस्कारी बाऊजी’ यांच्यावर मानहानीचा खटलाही दाखल करण्यात आला होता.. यासोबतच संध्या मृदुल आणि दीपिका अमीन यांनीही आलोक नाथ यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. याप्रकरणी आलोक नाथ यांना अटकपूर्व जामीनही मंजूर झाला होता.. पण तेव्हापासून ‘संस्कारी बाऊजी’ झगमगत्या विश्वापासून दूर आहेत.. सध्या आलोक नाथ कुठे आहेत आणि काय करतात असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे..

धक्कादायक गोष्ट म्हणजे, झगमगत्या विश्वापासून दूर झाल्यानंतर आलोक नाथ यांच्या निधनाची अफवा पसरल्या… दरम्यान, जेव्हा आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल्यानंतर, ‘संस्कारी बाऊजी’ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.. ‘जर मुलींसोबत असं काही झालं असेल तर, त्या २५ वर्षांनंतर का बोलत आहेत?’ असा प्रश्न देखील आलोक नाथ यांनी उपस्थित केला..

विनता नंदा बलात्कार प्रकरणात आलोक नाथ यांच्या विरोधात कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे या प्रकरणी पुढे काय झालं.. हे गुलदस्त्यात आहे. २०१८ साली वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर २०१९ पासून आलोक नाथ झगमगत्या विश्वापासून दूर आहेत.. ते सध्या कुठे आहेत, काय करतात याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही..

एक काळ असा देखील होता, जेव्हा आलोक नाथ त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले. आलोक नाथ आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या नात्याची चर्चा देखील तुफान रंगली.. जेव्हा आलोक नाथ ‘बुनियाद’ मालिकेत काम करत होते, तेव्हा अभिनेत्री नीना गुप्ता मालिकेत सुनेच्या भूमिकेत होत्या. एकत्र स्क्रिन शेअर करत असल्यामुळे त्यांचं नातं दिवसागणिक घट्ट होत होतं. पण आलोक नाथ आणि नीना गुप्ता यांची लव्हस्टोरी पूर्ण होवू शकली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार; दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि मालिका संपण्याच्या आधीच दोघे वेगळे झाले. नीना गुप्ता दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे आलोक नाथ यांची प्रेम कहाणी पूर्ण होवू शकलं नाही. नीना गुप्ता यांच्यासोबत नातं तुटल्यानंतर १९८७ साली आलोक नाथ यांनी आशु सिंग याच्यासोबत लग्न केलं. आलोक नाथ आणि आशु यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.