
आपल्या देशात फक्त सामान्य लोकच नाहीत तर असे अनेक बॉलिवूड स्टार देखील आहेत. जे अनेक गोष्टींवर विश्वास ठेवतात. तसेच हे सेलिब्रिटी अनेक रिच्यूअल फॉलो करतात. गुडलकसाठी हे सेलिब्रिटी नक्की काय काय करतात हे जाणून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण अनेक सेलिब्रिटींची गुडलकबद्दल वेगवेगळ्या धारणा आहेत. ज्यावर ते विश्वास ठेवतात. त्यापैकी काही जण चक्क सेटवर लिंबू -मिरची घेऊन जातात, तर काही जण दुसऱ्यांना लकी ब्रेसलेट घालण्याचा सल्लाही देतात.
रणवीर सिंग: या यादीत पहिलं नाव अभिनेता रणवीर सिंग आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अभिनेत्याची आई त्याला आजारापासून वाचवण्यासाठी त्याच्या पायात काळा धागा बांधते. रणवीरही यावर विश्वास ठेवतो.
रणबीर कपूर: रणबीर कपूरचाही या यादीत समावेश आहे. रणबीर 8 या क्रमांकाला त्याच्यासाठी खूप लकी मानतो. म्हणूनच त्याच्या प्रत्येक कृतीत 8 क्रमांक महत्त्वाचा भाग असलेला दिसून येतो. अभिनेता 8 या अंकाला इन्फिनिटी साइन म्हणून देखील पाहतो.
अक्षय कुमार: अक्षय कुमारबद्दल असे म्हटले जाते की तो त्याच्या फीचा हिशोब अशा प्रकारे ठेवतो की त्याची एकूण 9 येतो.
अमिताभ बच्चन: शतकातील सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना वाटते की जर त्यांनी भारताचा कोणताही सामना लाईव्ह पाहिला तर आपली टीम हारते. म्हणूनच ते कधीही लाईव्ह सामने पाहत नाही.
सलमान खान: सलमान खानबद्दल बोलायचं तर, तो नेहमी हातात निळा स्टोन असलेला ब्रेसलेट घालतो. जे तो स्वतःसाठी लकी मानतो.
शाहरुख खान: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा अंधश्रद्धाळू असल्याचंही म्हटलं जातं. या अभिनेत्याला 555 हा आकडा खूप आवडतो. त्याच्या प्रत्येक वाहनाच्या आकड्यामध्ये 555 असते. अभिनेत्याच्या मोबाईल नंबरमध्येही हा नंबर असल्याचं दिसून येतं.
बिपाशा बसू : अभिनेत्री बिपाशा बसूचाही या यादीत समावेश आहे. वाईट नजरेपासून वाचण्यासाठी अभिनेत्री ईवल आईचा वापर करते. दर शनिवारी ती तिच्या गाडीत लिंबू आणि मिरची बांधण्याची प्रथाही फॉलो करते.