
मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : प्रेमासाठी व्यक्ती कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार असतो. आपल्या आवडत्या व्यक्तीला कायम आवडेल, आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काय करता येईल… यासाठी प्रेमात असलेली प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असते. एकमेकांवर प्रेम असल्यामुळे दोघे अनेकांचा विरोध पत्कारत त्यांच्यात असलेल्या प्रेमाला अधिक महत्त्व देतात. बॉलिवूडमध्ये देखील असे अनेक कपल आहेत, जे फक्त आणि फक्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. बॉलिलूडमध्ये प्रेम, ब्रेकअप, लग्न, घटस्फोट अत्यंत सामान्य गोष्टी आहेत. पण चाहत्यांमध्ये मात्र त्यांच्या खासगी आयुष्याची कायम चर्चा रंलेली असते.
सध्या ज्या सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ते दुसरे तिसरे कोणी नसून अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग आहे. एक काळ असा होत, जेव्हा सर्वत्र फक्त सैफ आणि अमृता यांच्या नात्याची चर्चा असायची. सैफ याच्यासाठी लग्न कराता यावं म्हणून अमृता हिने स्वतःचा धर्म देखील बदलला. सैफ अली खान याच्यासोबत लग्न करता यावं म्हणून अभिनेत्रीने मुस्लीम धर्माचा स्वीकार केला.
एवढंच नाही तर, सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री सिनेमांपासून देखील ब्रेक घेतला. अमृता हिने पूर्ण वेळ मुलं आणि कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला. जेव्हा सैफ याच्यासोबत अमृता हिने लग्न केलं तेव्हा तिचं करियर यशाच्या उच्च शिखरावर होतं. पण लग्नानंतर अमृताने मोठ्या पडद्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
लग्नानंतर अमृता हिने मुलगी सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम अली खान याला जन्म दिला. पण दोघांचं लग्न अधिक काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अखेर तेरा वर्ष एकत्र राहिल्यानंतर सैफ अमृताने 2004 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर अभिनेत्रीने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. अमृता हिने सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ केला.
तर दुसरीकडे घटस्फोटानंतर अभिनेत्याने २०१२ मध्ये अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत लग्न केलं. सैफ आणि करीना यांच्या मुलांचं नाव तैमूर अली खान (Taimur Ali Khan) आणि जहांगीर अली खान (Jehangir Ali Khan). अमृताबद्दल सांगायचं झालं तर घटस्फोटानंतर अभिनेत्रीने दुसरं लग्न केलं नाही. सिंगल मदर म्हणून अमृताने सारा आणि इब्राहिम यांचा सांभाळ केला.