Ajit Pawar Death : महाराष्ट्राने प्रेमळ आणि डायनॅमिक नेता गमावला… अजितदादांच्या निधनाचा बॉलिवूडलाही धक्का

Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या निधनाने केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर बॉलिवूडवरही शोककळा पसरली आहे. अभिनेता अजय देवगणपासून ते रितेश देशमुखपर्यंत सर्वांनीच भावनिक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Ajit Pawar Death : महाराष्ट्राने प्रेमळ आणि डायनॅमिक नेता गमावला... अजितदादांच्या निधनाचा बॉलिवूडलाही धक्का
बॉअजित पवार यांच्या जाण्याने बॉलिवूडलाही धक्का
| Updated on: Jan 28, 2026 | 12:59 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. आज सकाळी 9 च्या सुमारास बारामती जवळ एक शेतात त्याचं विमान क्रॅश होऊन मोठा स्फोट झाला. त्यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील सहाही लोकांचा मृत्यू झाला. कमी दृश्यमानता असल्यामुळे हा भयानक अपघात झाल्याचे बोलले जात आहे. विमान खाली कोसळून मोठा स्फोट झाला. संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणासाठी धक्का असून अजित दादांचे चाहते, कार्यकर्ते, सर्व बारामतीकर हे शोकाकुल आहेत. पवार कुटुंबियांच्या दु:खाला तर पारावार उरलेला नाही. मात्र अजित दादांच्या जाण्याचा बॉलिवूडलाही मोठा धक्का बसला असून कंगना रानौत पासून ते रितेश देशमुखपर्यंत अनेकांनी अजित वार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कंगनाने व्यक्त केलं दु:ख

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रानौत यांनी अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. संसदेत पत्रकारांनी त्यांना वेढले होते. अजित पवारांच्या मृत्यूबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्या खूप हैराण दिसत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, ” हे खूप भयानक आहे. ही भयानक बातमी आहे. मला माफ करा,याबद्दल मला काहीही बोलायचे नाही.”. एकंदरच त्या बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या असं दिसतं होतं. नंतर त्यांनी सोशल मीडियावरून पोस्ट करत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

अभिनेता रितेश देशमुखची पोस्ट

अभिनेता रितेश देशमुख यानेही सोशल मीडियावर पोस्ट करत अजित पवार यांना आदरंजाली वाहिली. ‘एका दुःखद अपघातात आपण अजित दादा गमावल्याचे ऐकून खूप दुःख झाले. अजित दादा हे महाराष्ट्रातील सर्वात डायनॅमिक नेत्यांपैकी एक होते, त्यांन खराब कामगिरी अजिबात आवडायची नाही. ते नेहमीच त्यांच्या सभोवतालच्या लोकांना चांगले काम करण्यास प्रेरित करायचे. मनातलं बोलायालला ते कधीच संकोचायचे नाहीत. त्यांचा हजरजबाबीपणा उत्तम होता. आणि संपूर्ण राज्यातील लोकांचं त्यांच्यावर निरतिशय प्रेम होतं. त्यांच्या अकस्मात निधनाने मोठं नुकसान झालं आहे. मला त्यांना अनेक वेळा भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांनी माझ्यावर दाखवलेला दयाळूपणा मी नेहमीच लक्षात ठेवेन. पवार कुटुंब, त्यांच्या प्रियजनांना आणि त्यांच्या लाखो समर्थकांना माझ्या मनापासून संवेदना.” असं रितेशने म्हटलं.

 

अजय देवगणची पोस्ट

अभिनेता अजय देवगण यानेही त्याच्या पोस्टमधून दु:ख व्यक्त केलं. “माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांच्या दुःखद निधनाने धक्का बसला आणि दुःख झाले. त्यांच्या कुटुंबियांना, प्रियजनांना आणि या मोठ्या नुकसानाने प्रभावित झालेल्या सर्वांप्रती माझी मनापासून संवेदना.” असं त्याने पोस्टमध्ये नमूद केलं.

 

अनुपम खेर यांनीही अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.


राहुल वैद्य ची पोस्ट