रणवीर सिंग सोबत असं झालं तरी काय? अभिनेत्याने नोंदवला FIR

| Updated on: Apr 22, 2024 | 2:10 PM

Ranveer Singh files FIR | रणवीर सिंग याच्या अडचणीत वाढ, अभिनेत्याने नोंदवला FIR, अभिनेत्यासोबत असं झालं तरी काय? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणवीर सिंग याची चर्चा... रणवीर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतो चर्चेत...

रणवीर सिंग सोबत असं झालं तरी काय? अभिनेत्याने नोंदवला FIR
Follow us on

अभिनेता रणवीर सिंग गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पण आता अभिनेता एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. एका गंभीर प्रकरणी अभिनेत्याने पोलिसांची मदत घेतली आहे. रणवीर यांनी पोलिसांत एफआयआर नोंदवला आहे. डीपफेक व्हिडीओ प्रकरणी अभिनेत्याने पोलिसांत एफआयआर नोंदवला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणवीर सिंग याची चर्चा रंगली आहे.

निवडणुकीदरम्यान, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये अभिनेता एका राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे. पण हा डीपफेक व्हिडिओ आहे. आता रणवीरने या डीपफेक व्हिडिओवर कारवाई केली आहे.

व्हायरल होत असलेल्या डीपफेक व्हिडिओवर कारवाई करत रणवीर सिंगने एफआयआर नोंदवला आहे. रणवीर सिंगच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, डीपफेक व्हिडिओ प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि आता सायबर क्राइम सेल या प्रकरणाची चौकशी करणार आहे…

हे सुद्धा वाचा

एक स्टेटमेंट जारी करत अभिनेत्याचा प्रवक्ता म्हणाला, ‘आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संबंधीत सोशल मीडिया हँडलच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे. एआयच्या मदतीने तयार करण्यात आलेला व्हिडीओ डीपफेक व्हिडीओला दुजोरा देत आहे…’ आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सांगायचं झालं तर, रणवीर सिंग याने सोशल मीडियावर पोस्ट करत ‘डीपफेक व्हिडीओपासून स्वतःचा बचाव करा…’ असं चाहत्यांना सांगितलं होतं. रणवीर याचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल होण्यापूर्वी, बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये तो एका राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसत होता. याप्रकरणी देखील पोलिसांत एफआयआर नोंदवण्यात आला.

याआधी देखील अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. ज्यावर कारवाई देखील करण्यात आली. पण तरी देखील सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ व्हायरल होणं थांबत नसल्याचं चित्र समोर येत आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना, अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेत्री आलिया भट्ट यांचे देखील नको तसे डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. यावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चिंता आणि नाराजी व्यक्त केली होती. शिवाय बॉ़लिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील असे व्हिडीओ तयार करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे.. अशी पोस्ट करत संताप व्यक्त केला होता.