डॉली चायवाला आणि अरबाज खान करणार नव्या व्यवसायाला सुरुवात? भेटीचे फोटो समोर

डॉली चायवाला आणि अरबाज खान यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण, दोघांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरबाज आणि डॉली चायवाला यांच्या भेटीची चर्चा....

डॉली चायवाला आणि अरबाज खान करणार  नव्या व्यवसायाला सुरुवात? भेटीचे फोटो समोर
| Updated on: Feb 17, 2025 | 3:03 PM

डॉली चायवाला याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. चहा विकून डॉली चायवाला याने लाखो करोडो रुपये कमावले आहेत. डॉली चायवाला हा नागपूरचा व्हायरल चहा विकणारा आहे. 2024 मध्ये जेव्हा त्याने बिल गेट्स यांना चहा दिला तेव्हा तो प्रकाशझोतात आला. आता तो बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खानला भेटला आहे. या दोघांमध्ये व्यवयासाशी संबंधित चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Dolly Chaiwala याने सोशल मीडियावर अभिनेता अरबाज खान याच्यासोबत झालेल्या भेटीचे काही क्षण पोस्ट केले आहेत. अरबाजने त्याचं स्वागत ‘सुपरस्टार डॉली!!’ म्हणून केलं. तेव्हा डॉली चायवाला म्हणाला, ‘स्टार बोले तो एक ही भाई हैं हमारे, सलमान भाई… ‘, यावर सलमान खान म्हणतो, ‘तू देखील काही कमी नाही…’

 

 

डॉली चायवाल्याने अरबाज याच्यासोबत व्हिडीओ पोस्ट करतचा नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एक नेटकरी म्हणाला, ‘इतके वाईट दिवस आलेत का अरबाजचे, याच्यासोबत व्यवसाय करावा लागत आहे.’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘भाई चहाचा व्यवसाय सुरु करत आहे याच्यासोबत…’, आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘चायवाला अरबाजपेक्षा श्रीमंत आहे…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त डॉली चायवाला आणि अरबाज खान यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे.

अरबाज खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘तनाव’ सीरिजमध्ये झळकला होता. ज्यामध्ये अरबाज याने विक्रात राठोड या भूमिकेला न्याय दिला. आता सध्या अरबाज ‘सितारे जमीन पर’ सिनेमाच्या कामांमध्ये व्यस्त आहे.

अरबाज त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्याने वयाच्या 56 व्या वर्षी मेकअप आर्टिस्ट शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं. अरबाज आणि शुरा यांना कामय एकत्र स्पॉट केलं जातं.

एवढंच नाही तर, अरबाज कायम दुसऱ्या पत्नीसोबत फोटो पोस्ट करत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करत असतो. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. दोघांची जोडी देखील अनेकांना आवडते तर, काही मात्र ट्रोल करत असतात.