
सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचे फोटो व्हायरल झाला आहे. ही अभिनेत्री बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसेच तिने बड्या सुपरस्टारसोबत देखील काम केले आहे. या अभिनेत्रीने 2016मध्ये लपून ठवलेले फोटो समोर आले आहेत. ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घ्या या अभिनेत्रीविषयी आणि पाहा तिचे फोटो….
कोण आहे ती अभिनेत्री?
आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून करीना कपूर खान आहे. करीनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही जुने लपून ठेवलेले फोटो शेअर केले आहेत. खेरतर हे फोटो करीनाने 2016मधील जुन्या आठवणी म्हणत शेअर केले आहेत. २०२६ ला प्रेग्नन्सी ईयर म्हणत अभिनेत्रीने आपल्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय काळातील एकदा पुन्हा आठवण करून दिली. तेव्हा करीना तिचा पहिला मुलगा तैमूर अली खानच्या स्वागताची तयार करत होती.
काय आहेत फोटो?
पहिल्या फोटोत, करीना अॅनिमल प्रिंट मोनोकिनी घालून आपला एक शानदार सेल्फी शेअर केला आहे. त्यानंतर २०१६ मध्ये वोग इंडियाच्या कव्हरवरचा तिची फोटो, ज्यात तिने सफेद शर्ट आणि लेदर स्कर्ट घालून डंबेल हातात धरून पोज दिली होती. हे फोटो शेअर करत करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले होते की तेव्हा ती साडेतीन महिन्यांची प्रेग्नंट होती. आणखी एका फोटोत करीना करण जोहर आणि एका मित्रासोबत पोज देताना दिसली, ज्याचे कॅप्शन तिने मजाकिया अंदाजात दिले, “तो क्षण जेव्हा त्यांना कळले नव्हते की मी प्रेग्नंट आहे.”
या फोटोंमध्ये कुटुंबातील काही प्रेमळ क्षणही समाविष्ट होते. एका फोटोत करीना तिची बहिण करिश्मा कपूर, मलायका अरोरा, अमृता अरोरा, सलमान खान आणि सैफ अली खान यांच्यासोबत दिसत आहे. या फोटोला तिने “टिमच्या जन्मापूर्वी फक्त ४८ तास आधी” असे कॅप्शन दिले आहे. आणखी एका प्रेमळ फोटोत सैफ मोठ्या प्रेमाने करीनाच्या बेबी बंपला स्पर्श करताना दिसत आहे,
फॅन्स आणि इंडस्ट्रीतील मित्रांनी कमेंट सेक्शनमध्ये खूप तारीफ केली. अमृता अरोराने याला “सर्वोत्तम क्षण” म्हटले, तर अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर कुशा कपिलाने म्हटले की करीना ने “ट्रेंड जिंकला आहे.” अभिनेत्री अंजली आनंदने लिहिले की “बाकी सगळे घरी जाऊ शकतात,” आणि प्रशंसक या थ्रोबॅकला पाहून खूप खुश झाले. एकाने कमेंट केली की, “बेबोच्या २०१६च्या या फोटोंची आम्ही खूप वाट पाहिली.” दुसऱ्याने फोटोंना “सर्वोत्तम व्यक्तीच्या सर्वोत्तम फोटो” म्हटले.