मुंबईच्या महापौरपदी कोण बसणार? फडणवीसांनी सस्पेन्स संपवला, आता अडीच वर्षांचा…
मुंबईत महानगरपालिकेची निवडणूक भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने जिंकली आहे. त्यामुळे आता मुंबईच्या महापौरपदावर कोण बसणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis : राज्यातील 29 महापालिकांचा निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत बहुसंख्या पालिकांमध्ये भाजपाची सत्ता आलेली आहे. मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, अकोला, अमरावती, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक, मीरा भाईंदर या ठिकाणी महायुतीची सत्ता आलेली आहे. असे असतानाच आता सर्वांचेच लक्ष मुंबईच्या महापौरपदाकडे लागले आहे. मुंबईत कोणाचा महापौर होणार, असे सगळीकडेच विचारले जात आहे. असे असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महापौरपदावर मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता महापौर कोण होणार, याचं उत्तर अधिक गुंतागुंतीचं होत असल्याचे बोलले जात आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (17 जानेवारी) पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना मुंबईचा महापौर कोण होणार? असे विचारले. यावर उत्तर देताना वरच्या देवानेच महायुतीचा महापौर करायचा आहे, असं ठरवलं आहे. महापौर कोण करायचा हे एकनाथ शिंदे आणि मी सोबत बसून ठरवणार आहोत, असेही फडणवीस यांनी सांगितले.
Municipal Election 2026
Mumbai Municipal Election Results 2026 : मुंबई महापाैर आमचा व्हावा ही आमची इच्छा...
Maharashtra Municipal Election Results 2026 : राज ठाकरे यांच्याबद्दल स्पष्ट बोलले देवेंद्र फडणवीस...
AIMIM BMC Election 2026 : BMC मध्ये भाजपला सपोर्ट करणार की उद्धव ठाकरेंना? असदुद्दीन ओवैसींनी काय उत्तर दिलं?
Mumbai Election Result 2026 : संजय राऊत यांनी गद्दार, खुद्दार विश्लेषण करणं कमी करावं - प्रवीण दरेकर
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
आमच्यात कोणताही वाद होणार नाही
सोबतच मुंबईचे महापौरपद एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्यात अडीच-अडीच वर्षे वाटून घेतले जाणार का? असेही यावेळी फडणवीस यांना विचारण्यात आले. यावर बोलताना आम्ही याबाबत बसून सर्वकाही ठरवणार आहोत. महापौर कोण होणार? महापौरपदाची निवड कधी होणार? हे पद कोणाकडे किती वर्षे असणार? हे सर्वकाही आम्ही दोघेजण बसून ठरवणार आहोत. आमच्यात कोणताही वाद निर्माण होणार नाही. आम्ही छान पद्धतीने दोन्ही पक्ष चालवून दाखवू, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महापौर हिंदू आणि मराठीच असणार
दरम्यान, फडणवीस यांनी महापौर नेमका कोणाचा होणार? याबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर दिलेले नाही. महापौर हा मराठी आणि हिंदूच असेल एवढेच भाजपाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमक्या काय घडामोडी घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
