महापालिकेत अपयश, आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र…घडामोडी वाढल्या, राजकारणात खळबळ!
राज्यात नुकताच महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

NCP Alliance : राज्यात एकूण 29 महानगरपालिकांची निवडणूक संपली आहे. या निवडणुकीत भाजपाचा बोलबाला पाहायला मिळाला. बहुसंख्य महापालिकांत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली यासारख्या महत्त्वाच्या पालिकांत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीची सत्ता आली आहे. तर पुणे, पिंपरी चिंचवड या दोन महत्त्वाच्या पालिकांत भाजपाने मुसंडी मारत दोन्ही राष्ट्रवादींना धुळ चारली आहे. दरम्यान या निवडणुकी झालेला पराभव लक्षात घेऊन मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. लवकरच शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत काय घडलं?
महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांची राष्ट्रवादी तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मोठा जोर लावला होता. परंतु या दोन्ही पक्षांना अपेक्षित यश मिळालेले नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका जिंकण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले होते. शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह हाती घेऊन प्रचार करताना दिसल्या. परंतु या दोन्ही पक्षांना अपेक्षित यश मिळालेले नाही. 2017 सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला पुण्यात तब्बल 39 जागा मिळाल्या होत्या. परंतु यावेळी अजित पवारांना येथे 27 जागा मिळाल्या. शरद पवार यांच्या पक्षाला तर फक्त तीनच जागा मिळाल्या. शरद पवार यांच्या पक्षाला तर एकूण 18 महापालिकांत खातंदेखील उघडता आलं नाही.
Municipal Election 2026
देवेंद्र आणि रविंद्र या जोडगोळीने महाराष्ट्राच्या महापालिकेत चमत्कार घडवला
Maharashtra Election Results 2026 : अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा...
AIMIM BMC Election 2026 : BMC मध्ये भाजपला सपोर्ट करणार की उद्धव ठाकरेंना? असदुद्दीन ओवैसींनी काय उत्तर दिलं?
Mumbai Election Result 2026 : संजय राऊत यांनी गद्दार, खुद्दार विश्लेषण करणं कमी करावं - प्रवीण दरेकर
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
एकंदरीत सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन दोन्ही राष्ट्रवादी आता मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी आगामी काळातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढवणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनच पुढच्या निवडणुका लढवण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. तर 7 फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमक्या काय घडामोडी घणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
