AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीचा सुपडा साफ होताच… भाजपचा अजितदादांना दुसरा मोठा धक्का, या निर्णयाने खळबळ; घडामोडींना वेग?

Ajit Pawar NCP : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने अजित पवारांचा गेम केला आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपचा महापौर बसणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यानंतर आता भाजपने अजित पवारांना आणखी मोठा धक्का दिला आहे.

राष्ट्रवादीचा सुपडा साफ होताच... भाजपचा अजितदादांना दुसरा मोठा धक्का, या निर्णयाने खळबळ; घडामोडींना वेग?
Ajit Pawar and Fadnavis ZP ElectionImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 16, 2026 | 4:48 PM
Share

राज्यातील महानगरपालिकांचा निकाल जाहीर होत आहे, या निकालात भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबई पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकण्याची शक्यता आहे. या निकालानंतर आता लगेच जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. आजपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने अजित पवारांचा गेम केला आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपचा महापौर बसणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यानंतर आता भाजपने अजित पवारांना आणखी मोठा धक्का दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपचा स्वबळाचा नारा

महापालिकेच्या निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपने दूर ठेवले होते. अजित पवारांच्या पक्षाने जवळपास सर्वच ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. मात्र यात राष्ट्रवादीला फारसे यश मिळालेले नाही. त्यानंतर आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने अजित पवारांना धक्का देण्याची तयारी केली आहे. पुण्यातील जिल्हा परिषद निवडणूक भाजपने स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे.

Live

Municipal Election 2026

04:45 PM

Maharashtra Election Results 2026 : धुळे महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता...

04:27 PM

Pune Nagarsevak Election Results 2026 : सोनाली आंदेकर विजयी, थेट जेलमधून...

04:01 PM

Worli Ward 197 Election Result 2026 : आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिला मोठा झटका

03:17 PM

Mumbai Election Result 2026 : मतमोजणीला 5 तास, मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी

04:44 PM

पुण्यात रवींद्र धंगेकरांना धक्का, पत्नी पराभूत

04:27 PM

हा विजय धन शक्तीचा नाहीत जन शक्तीचा आहे, शंकर जगताप यांचा हल्ला

काय म्हणाले मंत्री चंद्रकांत पाटील?

याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी X वर लिहिले की, पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाने स्वबळाचा निर्धार व्यक्त करत, पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाची महत्त्वाची बैठक माझ्या व केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली.

यावेळी आगामी निवडणुकीची रणनिती, संघटनात्मक मजबुती तसेच उमेदवार निवडीसंदर्भात सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक भारतीय जनता पक्षाने स्वबळावर लढवावी, असा ठाम व एकमुखी सूर या बैठकीत उमटला. या बैठकीस पुणे उत्तर व पुणे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष, वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यक्रम

  • अर्ज दाखल करण्याची तारीख – 16 जानेवारी ते 21 जानेवारी.
  • अर्जांची छाननी – 22 जानेवारी
  • उमेदवारी माघारीची अंतिम मुदत – 27 जानेवारी, दुपारी 3 वाजेपर्यंत.
  • निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी – 27 जानेवारी दुपारी 3.30 वाजेनंतर जाहीर केली जाईल.
  • मतदानाचा दिनांक – 5 फेब्रुवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असेल.
  • मत मोजणी आणि निकाल – 7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजल्यापासून.
वसंतदादा पाटलाचं पणतू हर्षवर्धन पाटील विजयी!
वसंतदादा पाटलाचं पणतू हर्षवर्धन पाटील विजयी!.
अनेक पालिकांचे निकाल लागले, मुंबईच्या निकालाची प्रतीक्षा! काय आहे कल?
अनेक पालिकांचे निकाल लागले, मुंबईच्या निकालाची प्रतीक्षा! काय आहे कल?.
'डॅडी' अरूण गवळी यांची हवा, पण दोन्ही मुलींचा दारूण पराभूत
'डॅडी' अरूण गवळी यांची हवा, पण दोन्ही मुलींचा दारूण पराभूत.
नवी मुंबईत प्रभाग क्रमांक 8 मध्ये गणेश सपकाळ यांचा दणदणीत विजय
नवी मुंबईत प्रभाग क्रमांक 8 मध्ये गणेश सपकाळ यांचा दणदणीत विजय.
चंद्रपूरात भाजपला मोठा धक्का! काँग्रेस उमेदवारानं थेट महापौराला पाडलं!
चंद्रपूरात भाजपला मोठा धक्का! काँग्रेस उमेदवारानं थेट महापौराला पाडलं!.
कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मशीन बदलल्याचा आरोप
कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मशीन बदलल्याचा आरोप.
कोल्हापूरच्या प्रभाग 5 मध्ये काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी
कोल्हापूरच्या प्रभाग 5 मध्ये काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी.
पुणेकरांनी अजितदादांना नाकारलं, राष्ट्रवादीच कमबॅक नाहीच...
पुणेकरांनी अजितदादांना नाकारलं, राष्ट्रवादीच कमबॅक नाहीच....
चिंचवडमध्ये भाजप आमदार अमित गोरखेंच्या आई पिछाडीवर
चिंचवडमध्ये भाजप आमदार अमित गोरखेंच्या आई पिछाडीवर.
नितेश राणेंची ठाकरेंच्या हातातून मुंबई जाताच टीका, एकही शब्द न बोलता
नितेश राणेंची ठाकरेंच्या हातातून मुंबई जाताच टीका, एकही शब्द न बोलता.