AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खडतर होतं ‘या’ अभिनेत्रीचं आयुष्य, तिला म्हणायचे हडळ, 36 व्या वर्षी झाली विधवा आणि…

Bollywood Top Veteran Actress: बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला म्हणतात हडळ, अक्षय कुमारपासून संजूबाबापर्यंत प्रेमसंबंध, 36 व्या वर्षी झाली विधवा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

खडतर होतं 'या' अभिनेत्रीचं आयुष्य, तिला म्हणायचे हडळ, 36 व्या वर्षी झाली विधवा आणि...
फाईल फोटो
| Updated on: Oct 02, 2025 | 1:12 PM
Share

Bollywood Top Veteran Actress: झगमगत्या विश्वाचं आकर्षण प्रत्येकाला असतं. सिनेविश्वातून मिळणारी प्रसिद्धी, लोकप्रियता आणि संपत्ती… आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे… पण या झगमगत्या विश्वाची एक चांगली बाजू आहे तशीच वाईट बाजू देखील आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणं प्रचंड कठीण आहे. विशेषतः अभिनेत्रींसाठी… बॉलिवूडमध्ये काम करत असताना कधी कौतुक होतं, तर कधी टीकेचा देखील सामना करावा लागतो… आज अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊ जी प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचली, पण खासगी आयुष्यात अभिनेत्रीला चढ – उतारांचा सामना करावा लागला.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, तिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अनेकदा वादग्रस्त परिस्थितीत देखील अडकली… बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना अभिनेत्रीला अनेक जण हडळ देखील म्हणाले. एवढंच नाही तर, अनेकांसोबत अभिनेत्रीचं नाव देखील जोडण्यात आलं.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नाही तर, भानुरेखा गणेशन म्हणजेच बॉलिवूडच्या एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा आहेत. रेखा यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण त्यांचं आयुष्य सोपं नव्हतं. पण त्यांनी कधीच माघार घेतली नाही.

अनेक सेलिब्रिटींसोबत प्रेमसंबंध, लग्नाच्या 6 महिन्यांनंतर पतीने स्वतःचं आयुष्य संपवलं… अनेकांनी टीका केली… अशा असंख्य कठीण संकटांनी रेखा यांनी तोंड दिलं आहे. अभिनेता अक्षय कुमार याच्यापासून अभिनेता संजय दत्त याच्यासोबत देखील रेखा यांच्या नावाची चर्चा रंगली. एवढंच नाही तर, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत देखील रेखा यांचे प्रेमसंबंध होते. खुद्दा इमरान खान यांनी नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे…

वयाच्या 36 व्या वर्षी रेखा विधवा झाल्या. पण आजही त्या सिंदूर लावतात. अशात रेखा कोणाच्या नावाचं सिंदूर लावतात.. असा प्रश्न अनेकांनी विचारला. यावर रेखा यांनी उत्तर देखील दिलेलं, माझ्या मेकअप आणि साडीवर सिंदूर चांगला दिसतो म्हणून मी सिंदूर लावते… असं रेखा म्हणाल्या होत्या.

रेखा आणि अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील रेखा यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या.  अनेक सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र काम देखील केलं आहे. रेखा यांनी अनेकदा बिग बींवर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. पण अमिताभ बच्चन यांनी कधीच रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर कबुली दिली नाही.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?