AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मासिक पाळीत देवीचं दर्शन, प्रार्थना बेहेरेने मागितली माफी कारण…

Prarthana Behere: मासिक पाळीत देवीचं दर्शन घेतल्यानंतर प्रार्थना बेहेरेने का मागितली देवीची माफी..., कारण सांगत अभिनेत्री म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रार्थना बेहेरे हिची चर्चा...

मासिक पाळीत देवीचं दर्शन, प्रार्थना बेहेरेने मागितली माफी कारण...
फाईल फोटो
| Updated on: Oct 02, 2025 | 12:13 PM
Share

Prarthana Behere on period:  आज जग फार बदललं आहे. पण काही समजुती आजरी काही ठिकाणी तशाच आहे. अशीच एक समजूत म्हणजे मासिक पाळी दरम्यान देवाची पूजा करू नये… मासिक पाळीबाबत अनेक प्रकारच्या समजुती प्राचीन काळापासून प्रचलित आहेत. विशेषत: पूजा, उपवास आणि मंदिरात जाण्याबाबत खूप कडक नियम आहेत. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण या दिवसांमध्ये महिलांवर अनेक निर्बंध लादले जातात…

दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने मासिक पाळीचा एक किस्सा सांगितला आहे. प्रार्थना जेव्हा शालेय शिक्षण पूर्ण करत होती, तेव्हा आलेल्या मासिक पाळीबद्दल अभिनेत्रीने वक्तव्य केलं आहे. तेव्हा मासिक पाळी सुरु असल्यामुळे ‘तू देवीचं दर्शन घेऊ शकत नाही…’ असं अभिनेत्री अनेकांनी सांगितलं. पण प्रार्थना हिने दर्शन घेतलं आणि देवीची माफी मागितली.

प्रार्थना म्हणाली, मला याठिकाणी एक किस्सा शेअर करायचा आहे. कोणत्या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेल्यावर मला ती आईच वाटते…. आमच्या शाळेची सहल गुजरात येथील चामुंडा मातेच्या दर्शनासाठी गेली होती. आम्ही त्याठिकाणी खूप मज्जा करत होता. पण त्याच वेळी मला मासिक पाळी आहे. पहिल्या-दुसऱ्यांदाच मासिक पाळी आल्याने, मला देखील अंदाज नव्हता. मासिक पाळी आल्याने सगळे मला म्हणायला, तू देवीचं दर्शन घेऊ शकत नाही.’

‘त्यावेळी मला थोडी लाज वाटली. कारण मुलांना कसं सांगणार… मी दर्शनासाठी गेली नाही तर, सर्वांना कळेल… त्यामुळे मी दर्शनासाठी गेली… मी माझ्या मैत्रिणींना सांगितलं, मला काहीही फरक पडत नाही… मी दर्शनासाठी जाणार… मला माहिती नाही हे चांगलं आहे की वाईट पण मी दर्शनासाठी जाणार…’

प्रार्थना पुढे म्हणाली, ‘दर्शनासाठी गेल्यानंतर मी देवीची माफी मागितली… देवी तू माझी आई आहेस आणि तू पण एक नारी आहेस… त्यामुळे हे दुःख – वेदना तुला माहीत आहे… मला माहिती आहे तू मला माफ करशील… माझं काही चूकलं असेल तर मला माफ कर… कोणत्याही देवीच्या दर्शनासाठी गेल्यावर मला माझी आई आणि माझ्या सासूबाई दिसतात…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.