तात्या विंचू महात्मा गांधी झाला तेव्हा…, संजूबाबाला तालावर नाचवलं, सिनेमाने कमावले कोट्यवधी
Gandhi Jayanti Celebrations: जेव्हा तात्या विंचू महत्मा गांधी झाला तेव्हा... आजही मोठ्या पडद्यावर अभिनेत्याची जादू... संजूबाबाला तालावर नाचवलं आणि सिनेमाने कमावले कोट्यवधी रुपये...

Gandhi Jayanti Best Film: बॉलिवूडने प्रेक्षकांना असे काही सिनेमे दिले, जे जीवनाला मार्ग देणारे ठरले. एवढंच नाही तर, सिनेमातील काही भूमिका देखील खास ठरल्या. ज्या कधीच विसरता येणार नाही. अशीच एक भूमिका म्हणजे महत्मा गांधी यांची भूमिका. आज संपूर्ण देखील गांधी जयंती साजरी करत आहे. सांगायचं झालं तर, गांधीजींचं जीवन सर्वांसाठी आदर्श मानलं जातं. त्यांनी केवळ भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले नाही तर आपल्याला जीवनाचा मार्ग देखील दाखवला. बॉलिवूडमध्ये गांधीजींचं जीवन अनेक वेगवेगळ्या प्रकारे दाखवलं गेलं आहे.
गांधीजींच्या जीवनावरील सिनेमाची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा सर्वात जास्त चर्चा होते ती ‘लगे रहो मुन्ना भाई’ या बॉलिवूड सिनेमाची. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लहे रहो मुन्ना भाई’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी मजल मारली. सिनेमात अभिनेता संजय दत्त, अर्शद वारसी, विद्या बालन आणि बोमन ईराणी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. पण तुम्हाला माहिती आहे महात्मा गांधी यांची भूमिका कोणी साकारली होती?
राजकुमार हिरानी दिग्दर्शित या सिनेमाला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळालं. सिनेमाची कथा खूपच अनोखी होती, ज्यामध्ये गांधीजींचं व्यक्तिमत्व अगदी वेगळ्या पद्धतीने चित्रित करण्यात आलं होतं. सिनेमा गांधी यांची भूमिका मराठी सिनेविश्वातील दिग्गद अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली होती. सिनेमातील त्यांच्या भूमिकेला चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळालं.
दिलीप प्रभावळकर यांनी आतापर्यंत अनेक हटके भुमिकांना न्याय दिला आहे. त्यांनी फक्त गांधीजी यांच्याच भूमिकेला नाही तर, 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झपाटलेला’ सिनेमात ‘तात्या विंचू’ भूमिकेला न्याय दिला. सिनेमाला हिंदीमध्ये देखील डब करण्यात आलं…
दिलीप प्रभावळकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, मराठी सिनेविश्वातील ते फार मोठं नाव आहे. त्यांनी आतापर्यंत 28 सिनेमांमध्ये काम केलं आहे. दिलीप कुमार यांना लगे रहो मुन्ना भाई या सिनेमात गांधीजींची भूमिका साकारल्याबद्दल सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ही भूमिका अजूनही बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित गांधीजींच्या भूमिकांपैकी एक मानली जाते. आज वयाच्या 81 व्या वर्षी देखील प्रभावळकर अभिनय करत चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. ‘दशावतार’ सिनेमामुळे ते गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत.
