13 वर्षांपासून एकही हीट सिनेमा नाही, तरी 57 वर्षांची ‘ही’ अभिनेत्री कोट्यवधींचा मालकीण
Indias Richest Actress: बॉलिवूडपासून दूर तरीही 57 वर्षांची 'ही' अभिनेत्री कमावतेय कोट्यवधींची माया..., संपत्तीचा आकडा जाणून व्हाल थक्क, कोणत्या मार्गांनी कमाई करते अभिनेत्री

Indias Richest Actress: बॉलिवूडवर सध्या अभिनेत्री दीपिका पादुकोण, अभिनेत्री आलिया भट्ट आणि नयनतारा राज्य करत आहे. या अभिनेत्रींनी गेल्या काही वर्षात बॉलिवूडला हीट सिनेमे दिले आहेत. बॉलिवूडला अनेक हीट सिनेमा देणाऱ्या अभिनेत्रींची यादी फार मोठी आहे. ज्यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचं देखील नाव आहे. ऐश्वर्या आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण अभिनेत्रींच्या यादीत असं देखील एक नाव आहे, जे गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे, तरीही कोट्यवधींची मालकीण आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री…
नुकत्याच प्रकाशित झालेल्या हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार, अभिनेत्री जुही चावला ही भारतातील सर्वात श्रीमंत महिला स्टार आहे. अभिनेत्रीच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर, तिच्याकडे 7790 कोटी रुपयांची संपत्ती आहे. जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे जुही चावला… सागायचं झालं तर, श्रीमंतांची यादी हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारे दरवर्षी जाहीर केली जाते. चित्रपटसृष्टीव्यतिरिक्त, मुकेश अंबानी पुन्हा एकदा एकूण श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत, ज्यामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
View this post on Instagram
90 च्या दशकात जुही चावला बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक होती, परंतु 2000 च्या दशकात तिने सहाय्यक भूमिका साकारल्या. 2010 पासून, जुही चावला हिने गुलाब गँग, चॉक आणि डस्टर, एक लडकी को देखा तो ऐसा लगा, आणि शर्माजी नमकीन आणि फ्रायडे नाईट प्लॅन्स या सिनेमांमध्ये काम केले आहे. पण पूर्वी प्रमाणे अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही. ‘सन ऑफ सरदार’ मध्ये देखील अभिनेत्रीने दमदार भूमिका साकारली.
आज जुही बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
