Laal Singh Chaddha: ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये आईची भूमिका साकारणाऱ्या मोना सिंगवर उपस्थित केले प्रश्न, आमिरने दिलं सडेतोड उत्तर

| Updated on: Aug 02, 2022 | 10:06 AM

खऱ्या आयुष्यात मोना आमिर खानपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. 40 वर्षीय मोनाने 50 वर्षीय आमिर खानच्या आईची भूमिका साकारली आहे.

Laal Singh Chaddha: लाल सिंह चड्ढामध्ये आईची भूमिका साकारणाऱ्या मोना सिंगवर उपस्थित केले प्रश्न, आमिरने दिलं सडेतोड उत्तर
Laal Singh Chaddha: 'लाल सिंह चड्ढा'मध्ये आईची भूमिका साकारल्याबद्दल मोना सिंगवर उपस्थित केले प्रश्न
Image Credit source: Instagram
Follow us on

सध्या आमिर खान त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत असतानाच आता त्यावर आमिरने (Aamir Khan) आपली प्रतिक्रिया दिली. यानंतर आता पुन्हा एकदा आमिरने चित्रपटात त्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मोना सिंगच्या (Mona Singh) व्यक्तिरेखेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. वादात अडकलेल्या आमिर खानच्या या चित्रपटाबाबत दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. अलीकडेच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या आमिरने प्रेक्षकांना आपल्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नये आणि तो पाहावा, असं आवाहन केलं होतं. त्याच वेळी प्रमोशन दरम्यान आमिरने मोनाने साकारलेल्या आईच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. खऱ्या आयुष्यात मोना आमिर खानपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. 40 वर्षीय मोनाने 50 वर्षीय आमिर खानच्या आईची भूमिका साकारली आहे.

मोनाच्या व्यक्तिरेखेचं ​​कौतुक करताना आमिर म्हणाला, “आमच्या वयात फरक असूनही मोनाने माझ्या आईची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारली आहे. त्यामुळे तिच्या वयावर शंका घेणं योग्य ठरणार नाही.” या चित्रपटात आमिर हा लाल सिंग चड्ढा या भूमिकेत दिसणार आहे, तर मोना सिंग त्याच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या फॉरेस्ट गम्प या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपटात टॉम हँक्स मुख्य भूमिकेत दिसला होता.

टीकाकारांना आमिरचं उत्तर

नुकत्याच दिलेल्या एका ऑनलाइन मुलाखतीदरम्यान आमिरला प्रश्न विचारला असता त्याने उलट प्रश्न विचारला, “जर एखादा क्रिएटिव्ह अभिनेता असेल, तर तो त्याच्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्यामागे काय तर्क असू शकेल? अभिनेत्यासाठी वयोमर्यादा आहे का? ही तर त्या अभिनेत्यासाठी कमाल असते की तो कोणत्याही वयाचा असला तरी कोणत्याही वयाची भूमिका साकारू शकतो. तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? हे मोना सिंगबद्दल असेल तर आश्चर्यच आहे. जेव्हा तुम्ही तिला पहाल तेव्हा तुम्हाला ती खूप तरुण दिसेल, नंतर तुम्हाला वाटेल की ती खूप म्हातारी दिसत आहे. हाच त्या भूमिकेचा चमत्कार आहे. या प्रश्नांमुळे तुम्ही तिच्यापासून तिची अद्भुतता काढून घेत आहात. मोनाच्या जागी मी असतो तर खूप अस्वस्थ झालो असतो.”

हे सुद्धा वाचा

चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

आमिरचा वादग्रस्त चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ येत्या 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आमिरशिवाय करीना कपूर आणि मोना सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर साऊथचा अभिनेता नागा चैतन्य या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.