‘लाल सिंह चड्ढा’नंतर पहिल्यांदाच फुटबॉल मॅच बघण्यासाठी पोहचला आमिर खान, व्हिडीओ व्हायरल

नुकताच आमिर खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

लाल सिंह चड्ढानंतर पहिल्यांदाच फुटबॉल मॅच बघण्यासाठी पोहचला आमिर खान, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Dec 01, 2022 | 8:56 PM

मुंबई : लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या माध्यमातून आमिर खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. लाल सिंह चड्ढाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतू या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. चित्रपटाचे टीझर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू होती आणि याचाच फटका चित्रपटाला बसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खान हा अनेक कार्यक्रमांमध्ये जाणे टाळत होता. नुकताच आमिर खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आमिर खानची मुलगी इरा खान हिच्या साखरपुड्यामध्ये आमिर खान दिसला होता. त्यापूर्वी मुंबईमध्ये आमिर खान स्पाॅट झाला होता. त्यावेळी थकलेला चेहरा आणि पांढरी दाढी पाहून आमिर खानचे चाहते चिंतेमध्ये पडले होते.

दोन दिवसांपूर्वी आमिर खान विमानतळावर स्पाॅट झाला होता. यावेळी त्याची पूर्व पत्नी किरण आणि मुलगा आझाद देखील सोबत होते. लाल सिंह चड्ढाच्या रिलीजनंतर पहिल्यांदाच आमिर सुट्टी घालवण्यासाठी जाताना दिसला.

सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यामध्ये आमिर फीफा वर्ल्ड कपमध्ये मॅच बघण्यासाठी गेल्याचे दिसत आहे. यावेळी आमिरने त्याच्या चाहत्यांसोबत फोटोही काढले आहेत. हा व्हिडीओ लुसैल स्टेडियम बाहेरचा आहे.

लाल सिंह चड्ढा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खानने अत्यंत मोठा निर्णय घेतला. त्याने हे स्पष्ट केले होते की, मी काही काळ माझ्या कुटुंबाला वेळ देणार आहे.

नुकताच मुंबईमध्ये आमिर खानच्या लेकीचा साखरपुडा झाला आहे. नुपूर शिखरेसोबत इरा खानने साखरपुडा केला आहे. यांच्या साखरपुड्यामधील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.