आदिवी शेष याने अखेर व्यक्त केली मनातील खदखद, म्हणाला तेलुगू इंडस्ट्रीमध्ये…

| Updated on: Dec 23, 2022 | 8:06 PM

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आदिवी शेष याने अनेक मोठे खुलासे केले आहेत.

आदिवी शेष याने अखेर व्यक्त केली मनातील खदखद, म्हणाला तेलुगू इंडस्ट्रीमध्ये...
Follow us on

मुंबई : आदिवी शेष हा मेजर या चित्रपटापासून चर्चेत आलाय. मेजर या चित्रपटामध्ये आदिवी शेष याने जबरदस्त भूमिका केली. या चित्रपटासाठी आदिवीने मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आदिवी शेष याने अनेक मोठे खुलासे केले आहेत. काही वर्षांपासून आदिवी शेषने अभिनेत्यासोबतच स्क्रिप्ट रायटिंगला सुरूवात केलीये. या मुलाखतीमध्ये त्याने चित्रपटाच्या स्क्रिप्ट लिहिण्याचे कारणही थेट सांगून टाकले आहे. इतकेच नाहीतर त्याने तेलुगू इंडस्ट्रीमधील काही गोष्टीवरून पडद्या उठवला आहे.

मुलाखतीमध्ये आदिवी शेष याने म्हटले की, तेलुगू इंडस्ट्रीमध्ये चित्रपटातील रोलसाठी ऑडिशन वगैरे असे काही होत नाही. खास करून बाहेरच्या लोकांसाठी तर अजिबातच नाही. एखादा चित्रपट असेल तर त्या चित्रपटातील सर्व प्रमुख भूमिकांसाठी चित्रपट क्षेत्रातीलच परिवारांचा कब्जा असतो.

तेलुगू इंडस्ट्रीमध्ये बाहेरच्या लोकांना कधीच संधी मिळत नाही. त्यांचे ऑडिशन फक्त हिरोच्या मित्रांच्या रोलसाठी किंवा इतर छोट्या रोलसाठी होतात. चित्रपटातील मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेसाठी तिकडे ऑडिशन होत नाहीत.

पुढे आदिवी शेष म्हणाला, माझ्यासारख्या अभिनेत्याचा स्क्रिप्टसाठी सर्वात शेवटी विचार केला जातो. जेंव्हा तुम्ही बाहेरून येता, त्यावेळी तुम्हाला चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी आॅफर येत नाहीत. तुमचा विचारही केली जात नाही.

या कारणामुळे मी खरोखरच खूप थकलो होतो. यामध्येही तेलुगू इंडस्ट्रीमध्ये एका परिवारामध्ये दहा हिरो असतात. यामुळे कुठल्या चांगल्या स्क्रिप्टसाठी तुम्ही शेवटची पसंद बनतात. यामुळेच मी लिहायला सुरूवात केली आणि माझ्यासाठी हे सोपे नक्कीच ठरले आहे.

तेलुगू इंडस्ट्रीमध्ये मुळातच ऑडिशन हे कल्चरच नाहीये. चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी तर अजिबातच नाहीये. कारण एखादी चांगली स्क्रिप्ट असेल तर अगोदरच त्यासाठी अभिनेता हा बुक असतो. यामुळे बाहेरून आलेल्यांना फार संधी ही तेलुगू इंडस्ट्रीमध्ये मिळत नाही.