
ऐश्वर्या राय ही अशी अभिनेत्री आहे, जिचे आजही देशभरात कोट्यवधी चाहते आहेत. तिच्या सौंदर्याची आजही अनेकांना भुरळ आहे.

तिने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलेले आहे. चित्रपट निवडताना ती नेहमीच काळजी घेते. चित्रपटात तिचे सीन कसे आहेत? याकडे ती प्राधान्याने लक्ष ठेवते. मात्र याच ऐश्वर्या रायने चक्क ऋतिक रोशनला किस केलं होतं.

ऐश्वर्या राय आणि ऋतिक रोशन यांचा 2006 साली धूम-2 हा चित्रपट आला होता. त्या काळात ऐश्वर्या राय यशाच्या शिखरावर होती. याच चित्रपटात सध्या ऐश्वर्याचा पती असलेला अभिनेता अभिषेक बच्चन हादेखील होता.

या चित्रपटात लोकांनी ऐश्वर्या राय आणि ऋतिक रोशन यांच्या जोडीला चांगलीच पसंती दिली होती.

याच धूम-2 या चित्रपटात ऐश्वर्या रायने ऋतिक रोशनला ऑनस्क्रीन किस केलं होतं. तसा एक सीन चित्रपटात आहे. मात्र या सीननंतर ती चांगलीच परेशान झाली होती. कारण या किसमुळे तिला थेट कायदेशीर नोटिशी मिळाल्या होत्या.

ऐश्वर्या रायचा ऋतिक रोशनसोबतचा हा पहिलाच किसिंग सीन होता. या सीनमुळे तिला धमक्या मिळाल्या होत्या. तसेच काही लोकांनी तिला कायदेशीर नोटिशी पाठवल्या होत्या.

आम्ही तुला रोल मॉडेल मानतो. तू अन्य महिलांसाठी चांगलं उदाहरण आहेस, त्यामुळे तू अशा प्रकारचे सीन कसे देऊ शकतेस, असे या नोटिशींत म्हणण्यात आले होते.

या नोटिशी मिळाल्यानंतर ऐश्वर्या राय चांगलीच हैराण झाली होती.