Good News | लिसा हेडनच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन, अभिनेत्री तिसऱ्यांदा बनली आई!

वृत्तानुसार, लिसा हेडन आणि तिचा नवरा दिनो लालवाणी यांने अलीकडेच आपल्या तिसर्‍या बाळाचे स्वागत केले आहे. मात्र, स्वत: अभिनेत्रीने अद्याप ही माहिती चाहत्यांसह अधिकृतपणे शेअर केलेली नाही.

Good News | लिसा हेडनच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन, अभिनेत्री तिसऱ्यांदा बनली आई!
लिसा हेडन
| Edited By: | Updated on: Jul 02, 2021 | 10:25 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल लिसा हेडन (Lisa Haydon) रणबीर कपूरसमवेत ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटात झळकली होती. आता लिसा पुन्हा एकदा आई झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार लिसाने एका मुलीला जन्म दिला आहे. एका मुलीच्या जन्मासह, लिसा हेडन आता तिसऱ्यांदा आई बनली आहे (Actress Lisa Haydon gives birth to baby girl).

वृत्तानुसार, लिसा हेडन आणि तिचा नवरा दिनो लालवाणी यांने अलीकडेच आपल्या तिसर्‍या बाळाचे स्वागत केले आहे. मात्र, स्वत: अभिनेत्रीने अद्याप ही माहिती चाहत्यांसह अधिकृतपणे शेअर केलेली नाही.

अभिनेत्री तिसऱ्यांदा बनली आई

जेव्हा एका वापरकर्त्याने हा प्रश्न विचारला आणि अभिनेत्रीने या प्रश्नावर उत्तर दिले तेव्हा अभिनेत्री आई बनल्याची माहिती समोर आली. या अभिनेत्रीने स्वतः चाहत्यांना सांगितले होते की, जूनमध्ये ती आई होणार आहे. ती तिसर्‍या बाळाला जन्म देणार आहे.

याची आधीच माहिती असल्याने चाहते सतत अभिनेत्रीची आई होण्याची वाट पाहत होते. दरम्यान, अभिनेत्री लिसा हेडनच्या एका चाहत्याने अलीकडेच तिला विचारले की, आपले तिसरे लहान मुल आता कुठे आहे, ते मला सांगू शकता का? यावर अभिनेत्रीने उत्तर दिले, ‘माझ्या हातांमध्ये’.

यापूर्वी अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती असे म्हणताना दिसली आहे की, आळशीपणामुळे ती आपल्या प्रेग्नन्सीबद्दल चाहत्यांना माहिती देऊ शकली नाही.

आमची छोटी बहिण!

यानंतर अभिनेत्रीने आपला मुलगा जॅककडे कॅमेरा वळवला आणि मग जॅकला विचारते की, आईच्या पोटात काय आहे हे तू लोकांना सांगू शकतोस का?  त्यावर जॅक म्हणतो, ‘छोटी बहिण’ म्हणतात. त्यानंतर चाहत्यांना हे स्पष्ट झाले होते की, ही अभिनेत्री मुलीला जन्म देणार आहे.

लिसा हेडनने 2016मध्ये डिनो लालवाणीशी लग्न केले होते. यानंतर तिने 2017मध्ये पहिला मुलगा जॅक याला जन्म दिला, त्यानंतर 2020मध्ये दुसरा मुलगा लिओ याचा जन्म झाला. याशिवाय ती ‘हाऊसफुल 3’, ‘द शौकीन्स’, ‘रास्कल्स’, ‘क्वीन’, ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

(Actress Lisa Haydon gives birth to baby girl)

हेही वाचा :

Photo : शॉर्ट अँड शिमरी ड्रेसमध्ये हुमा कुरेशीचं नवं फोटोशूट, म्हणाली ‘स्वत:हा मधल्या महाराणीला शोधा…’

PHOTO | करिअरच्या सुरुवातीला वडापाव खाऊन काढले दिवस, आता छोटा पडदा गाजवतेय सुंबुल खान!