Swara Bhaskar Wedding | स्वरा भास्कर हिने समाजवादी पक्षाच्या या नेत्यासोबत केले कोर्ट मॅरेज, अगदी गुपचूप पद्धतीने लग्न आणि…

अगदी गुपचूप पद्धतीने स्वरा भास्कर हिने आपले लग्न उरकून घेतले आहे. तसेच एक व्हिडीओ शेअर करत तिने आपली संपूर्ण लव्ह स्टोरी दाखवण्याचाही प्रयत्न केला आहे.

Swara Bhaskar Wedding | स्वरा भास्कर हिने समाजवादी पक्षाच्या या नेत्यासोबत केले कोर्ट मॅरेज, अगदी गुपचूप पद्धतीने लग्न आणि...
| Updated on: Feb 16, 2023 | 7:41 PM

मुंबई : जानेवारी महिन्यात बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिने एक खास फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये एक म‍िस्‍ट्री मॅन दिसत होता, त्याचा पूर्ण चेहरा दिसत नव्हता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. स्वरा भास्कर हिच्यासोबत दिसणारा म‍िस्‍ट्री मॅन (Mystery Man) कोण यावर चर्चा रंगत होत्या. अखेर तो म‍िस्‍ट्री मॅन कोण याची ओळख करून देत स्वरा भास्कर हिने 6 जानेवारी रोजी लग्नगाठ बांधल्याचे देखील जाहिर केले आहे. अगदी गुपचूप पद्धतीने स्वरा भास्कर हिने आपले लग्न उरकून घेतले आहे. तसेच एक व्हिडीओ शेअर करत तिने आपली संपूर्ण लव्ह स्टोरी दाखवण्याचाही प्रयत्न केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने लग्नातील काही फोटोही शेअर केले आहेत. कोर्टामध्ये तिने लग्न (Wedding) केले असून लग्न झाल्यानंतरचेही काही फोटो या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. आता सोशल मीडियावर स्वरा भास्कर हिची पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत असून चाहते या पोस्टवर तिला लग्नाच्या शुभेच्छा देताना देखील दिसत आहेत.

स्वरा भास्कर हिने समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमद याच्यासोबत कोर्ट मॅरेज केले आहे. 6 जानेवारीलाच तिने हे लग्न केले. स्वरा हिने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या फोटोमधील व्यक्ती हा फहाद अहमद असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

स्वरा भास्कर हिचा पती फहाद अहमद हा समाजवादी पक्षाचा युवाजन सभेचा प्रदेशाध्यक्ष आहे. स्वरा भास्कर हिने जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये तिने तिची आणि फहाद अहमद याची संपूर्ण लव्ह स्टोरीच सांगून टाकली आहे.

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी 6 जानेवारी रोजी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत लग्नाची नोंदणी केली होती. विशेष म्हणजे लग्नानंतरच्या एका फोटोमध्ये स्वरा भास्कर ही रडताना देखील दिसत आहे.

हा खास व्हिडीओ शेअर करताना स्वरा भास्कर हिने लिहिले की, बऱ्याच वेळा तुम्ही तुमच्या शेजारी असलेल्या व्यक्तीला जगभर शोधता… आम्ही प्रेम शोधत होतो, मात्र आम्हाला अगोदर मैत्री सापडली आणि नंतर आम्ही एकमेकांचे झालो. फहाद अहमद माझ्या द‍िलमध्ये तुझे स्वागत आहे… इथे खूप गोंधळ आहे, पण तो तुझा आहे…

आता सोशल मीडियावर स्वरा भास्कर हिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी चर्चा होत्या की, स्वरा भास्कर ही ह‍िमांशू शर्माला डेट करत आहे. परंतू 2019 मध्ये त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या होत्या.