ऐश्वर्या राय-बच्चन पुन्हा झळकणार मणिरत्नमच्या चित्रपटात, 400 ज्युनिअर आर्टिस्टसोबत शूट केले ‘पोन्नीयन सेल्वन’चे गाणे!

| Updated on: Sep 14, 2021 | 4:20 PM

जेव्हापासून देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे आणि शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे, तेव्हापासून अनेक नवीन प्रकल्पांची शूटिंग सुरू झाली आहे. त्यापैकी एक म्हणजे मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट 'पोन्नीयन सेल्वन' (Ponniyan Selvan). चित्रपटाचे शूटिंग खूप वेगाने सुरू आहे.

ऐश्वर्या राय-बच्चन पुन्हा झळकणार मणिरत्नमच्या चित्रपटात, 400 ज्युनिअर आर्टिस्टसोबत शूट केले पोन्नीयन सेल्वनचे गाणे!
Aishwarya Rai
Follow us on

मुंबई : जेव्हापासून देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे आणि शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे, तेव्हापासून अनेक नवीन प्रकल्पांची शूटिंग सुरू झाली आहे. त्यापैकी एक म्हणजे मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘पोन्नीयन सेल्वन’ (Ponniyan Selvan). चित्रपटाचे शूटिंग खूप वेगाने सुरू आहे. हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे, जो कल्की कृष्णमूर्ती यांच्या ‘पोन्नीयन सेल्वन’ या कादंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी 1955 साली प्रकाशित झाली होती. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai), विक्रम, प्रकाश राज, तृषा, कार्ती, जयराम रवी, शोभिता आणि धुलीपाला यांच्यासह बॉलिवूड आणि टॉलीवुडमधील अनेक प्रमुख कलाकार दिसणार आहेत.

गेल्या काही आठवड्यांत पुडुचेरीमध्ये चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर, टीम गेल्या आठवड्यात त्यांच्या पुढील शेड्यूलसाठी मध्य प्रदेशातील महेश्वरला पोहोचली आहे. जिथे ऐश्वर्या राय बच्चनने 400 ज्युनिअर आर्टिस्टसह एक गाणे शूट केले आहे. ऐश्वर्या इथे फक्त दोन दिवसांच्या शूटिंगसाठी होती. उर्वरित कलाकार आणि क्रू गेल्या आठवड्यापासून ओरछा, ग्वाल्हेर आणि महेश्वरमध्ये आहेत. मणिरत्नमला एका मोठ्या स्तरावर गाणे शूट करायचे होते, ज्यासाठी त्याने 400 पेक्षा जास्त ज्युनिअर आर्टिस्ट घेण्याचे ठरवले होते.

सेटवर रोज होते कोरोन चाचणी

या सर्व ज्युनिअर आर्टिस्ट यांनी लसीचे दोन्ही डोस देखील घेतले आहेत आणि दररोज या सेटवर कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. हे एक उत्तम आणि भव्य नृत्य असणार आहे. याआधी ऐश्वर्या हैदराबादमध्ये या गाण्याचे चित्रीकरण करणार असल्याचे वृत्त होते. पण त्याचे चित्रीकरण आता मध्य प्रदेशात झाले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या नृत्यदिग्दर्शक वृंदा गोपाल यांनी हे गाणे कोरिओग्राफ केले आहे. टीमने महेश्वर घाटावर गाण्याचे सीक्वेन्स शूट केले, जिथे ‘पॅड मॅन’ आणि ‘दबंग 3’ सारखे चित्रपट शूट झाले आहेत.

बिग बजेट चित्रपट दोन भागात होणार प्रदर्शित!

माध्यमांच्या अहवालानुसार चित्रपटाचे चित्रीकरण तगड्या बजेटसह करण्यात आले आहे(Ponniyin Selvan Budget). ‘पोन्नीयन सेल्वन’ हा चित्रपट सुमारे 500 कोटी रुपयांच्या बजेटवर बनवला जात आहे. कथा अनेक वर्षांपूर्वीची आहे आणि त्यात 50पेक्षा जास्त मुख्य पात्र आहेत. थायलंडमध्ये याचे मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण झाले आहे आणि हैदराबादच्या बाहेरील भागात एक सेट देखील तयार करण्यात आला आहे. 1500 पेक्षा जास्त ज्युनिअर आर्टिस्ट वेगवेगळ्या वेळापत्रकांमध्ये सामील आहेत. चित्रपटाचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून, हा चित्रपट दोन भागांमध्ये रिलीज होणार आहे. पण, दोन्ही भाग एकाच वेळी शूट केले जात आहेत.

हेही वाचा :

मुंबई विमानतळावर दीपिका पादुकोणचा क्लासी अंदाज कॅमेऱ्यात कैद, चाहत्यांना आली रणवीर सिंगची आठवण

समंथाची पती नागा चैतन्यच्या पोस्टवर खास कमेंट, घटस्फोटाच्या बातम्यांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न?

Defamation Case : कंगना पुन्हा अनुपस्थित, न्यायाधीश म्हणाले ‘पुढच्या सुनावणीस गैरहजर राहिल्यास अटकेचे वॉरंट निघणार!’