आयुष्मान खुराना आणि अक्षय कुमार ‘अ‍ॅक्शन हिरो’मध्ये धमाका करणार, पाहा चित्रपटाचे पोस्टर

आयुष्यान खुराना दिसतोय. विशेष म्हणजे आयुष्यानचा पोस्टरमध्ये जबरदस्त असा लूक दिसतोय.

आयुष्मान खुराना आणि अक्षय कुमार अ‍ॅक्शन हिरोमध्ये धमाका करणार, पाहा चित्रपटाचे पोस्टर
| Updated on: Nov 11, 2022 | 9:54 AM

मुंबई : ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो’ची प्रतीक्षा वाढत जात आहे. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाचे एक जबरदस्त असे पोस्टर रिलीज करून चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी क्रेझ वाढवण्याचे काम केले आहे. या पोस्टरमध्ये सर्वांचा आवडता अभिनेता आयुष्यान खुराना दिसतोय. विशेष म्हणजे आयुष्यानचा पोस्टरमध्ये जबरदस्त असा लूक दिसतोय. चाहत्यांना हे पोस्टर आवडले असून एक बातमी येत आहे की, या चित्रपटात अक्षय कुमार देखील कॅमिओ करणार आहे. जर हे खरे असेल तर पहिल्यांदाच अक्षय आणि आयुष्मान सोबत स्क्रीन शेअर करतील.

आयुष्मान खुराना आणि अक्षय कुमारचे चाहते या दोघांना सोबत पाहण्यास इच्छुक आहेत. अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरोमध्ये अक्षय आणि आयुष्मान सोबत दिसणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागलीये. मात्र, यासंदर्भात अजूनही चित्रपट निर्माते किंवा आयुष्मान यांनी काही खुलासा केला नाहीये. या चित्रपटात आयुष्मान खुराना जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे.

चित्रपटाच्या रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये आयुष्मान खुराना हातामध्ये बंदूक घेऊन उभा आहे. पोस्टरमध्ये चित्रपटाच्या चेजिंग सीक्वेन्सची झलक आहे. विशेष म्हणजे आज चित्रपटाचे ट्रेलर रिलाज होणार असल्याची माहिती मिळत आहे. आयुष्मान खुरानाच्या या चित्रपटात जर खरोखरच अक्षय कुमारचा कॅमियो असेल तर अधिकच धमाका होणार हे नक्की आहे.