प्रभासच्या चित्रपटासाठी महानायकाचा आवाज; ‘राधेश्याम’मध्ये बिग बींचा व्हॉईसओव्हर

येत्या ११ मार्च रोजी हा चित्रपट (Radhe Shyam) तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

प्रभासच्या चित्रपटासाठी महानायकाचा आवाज; 'राधेश्याम'मध्ये बिग बींचा व्हॉईसओव्हर
Prabhas and Amitabh BachchanImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 4:39 PM

‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) यांच्या आगामी ‘राधेश्याम’ (Radhe Shyam) या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आवाज दिला आहे. मंगळवारी निर्मात्यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित हा रोमँटिक चित्रपट विविध भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. युरोपमधील १०७०चा काळ यामध्ये दाखवण्यात येणार असून प्रभास विक्रमादित्य ही भूमिका साकारणार आहे. तर पूजा हेगडे ही प्रेरणाच्या भूमिकेत आहे. विक्रमादित्य आणि प्रेरणा यांची अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांना या चित्रपटात पहायला मिळणार आहे. ‘राधेश्याम’ या चित्रपटासाठी एका सुपरिचित आवाजाची गरज होती आणि बिग बींशिवाय चांगला आवाज कुणाचा मिळाला नसता, असं दिग्दर्शक कुमार म्हणाले.

“१९७०च्या दशकातील कथानक या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. चित्रपटाचा दर्जा आणि कथानकाची गरज पाहता आम्हाला देशभरात प्रसिद्ध असलेल्या आवाजाची गरज होती. तो आवाज अमिताभ बच्चन यांच्याशिवाय दुसरा कुठला असूच शकत नाही. प्रत्येकजण त्याच्या आवाजाशी परिचित आहे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकजण त्या आवाजावर प्रेम करतो, त्याचा आदर करतो. बिग बींचा व्हॉईसओव्हर मिळाल्याने आम्ही खूप खूश आहोत”, अशी भावना दिग्दर्शकांनी व्यक्त केली.

यानिमित्ताने प्रभास आणि अमिताभ बच्चन हे दुसऱ्यांदा एकमेकांसोबत काम करणार आहेत. याआधी ‘प्रोजेक्ट के’साठी दोघांनी एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट सध्या प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे. राधेश्याम या चित्रपटात प्रभास आणि पूजाशिवाय भाग्यश्री, मुरली शर्मा, सचिन खेडेकर, प्रियादर्शी, सेशा छेत्री, कुणाल रॉय कपूर आणि सत्यान यांच्या भूमिका आहेत. गुलशन कुमार आणि टी सीरिज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती युव्ही क्रिएशन्स, भुषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे. येत्या ११ मार्च रोजी हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.